३ लाख २४ हजार रुपयांच्या गॅरेजमधील मालाच्या चोरी प्रकरणी दोन जण अटकेत..
         चोरी प्रकरणी दोन जण अटकेत..


पनवेल दि.२७(संजय कदम): पनवेल तालुक्यातील परंपुंड गाव येथील एका गॅरेज मध्ये ४ जणांनी मिळून केलेल्या चोरी प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.  
        येथील ओमेमाँ इंजियरिंग गॅरेज या ठिकाणी असलेल्या वॉचमनला अज्ञात इसमांनी मारहाण करून   येथील शेड खाली उघड्यावर ठेवलेला डोझरचे १४ रोलर, ८ कॅरर रोलर आणि इतर भंगार सामान असा मिळून पीक अप टेम्पो मधून ते पसार झाले होते. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रकाश पवार, पोलीस उप निरीक्षक हर्षद जुईकर, पोहवा महेश पाटील,अमोल पाटील,  पोना मिथुन भोसले, अशोक राठोड, पोशी विशाल दुधे आदींचे पथक सदर गुन्ह्यांमधील आरोपींचा शोध घेत असतात पोना मिथुन भोसले याना गुप्त बातमीदाराकडून अहित मिळाली कि सदर गुन्ह्यातील काही आरोपी आंबिवली कल्याण ठाणे येथे लपले आहेत. त्यानुसार सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी नसिम मंजूर खान(वय २१) बद्री आलम मेहमुद अलम खान(वय ३८) या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या कडून गुन्ह्यातील काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर या गुन्ह्यातील इतर दोन आरोपींचा शोध पनवेल शहर करीत आहेत.
Comments