पनवेल मधील २ जलतरणपटूंनी पटकावली पदके...
पनवेल मधील २ जलतरणपटूंनी पटकावली पदके...

पनवेल दि.२८(संजय कदम): पनवेल मधील २ जलतरणपटूंनी विविध प्रकारांमध्ये पदके पटकावून पनवेलचे नाव उंचावले आहे.
        रायगड जिल्ह्यातील दोन जलतरणपटू हसन शेख (वय: 25) आणि सनी राजेश टाक (वय: 28) यांनी येम्मकेरे येथे आयोजित कर्नाटक जलतरण संघटनेने आयोजित केलेल्या भारतीय जलतरण महासंघाने संलग्न असलेल्या 19 व्या राष्ट्रीय मास्टर्स चॅम्पियनशिप 2022-23 मध्ये भाग घेतला. सदर स्पर्धा 24 ते 26 नोव्हेंबर 2023 दरम्यान जलतरण तलाव, मंगळुरु, कर्नाटक येथे संपन्न झाली. या स्पर्धेत हसन शेखने 100 मीटर बटरफ्लाय इव्हेंट आणि 4 x 50 मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेत 2 सुवर्णपदके जिंकली आणि सनी राजेश टाकने 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक आणि 4 x 50 मीटर फ्रीस्टाइल रिले स्पर्धेत अनुक्रमे 1 कांस्य आणि 1 सुवर्णपदक जिंकले.त्यांच्या यशा बद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.



फोटो: जलतरण स्पर्धा
Comments
Popular posts
'शौर्यम दिवस' के मौके पर 'शौर्यम ट्रिब्यूट बाइक राइड' का आयोजन...
Image
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
हृदयाच्या आरोग्यासाठी खारघरमध्ये 'वॉकेथॉन' ; जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा उपक्रम...
Image
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखेंची पेणमध्ये सदिच्छा भेट ; बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाला उपस्थिती
Image
उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत क्रीडांगण उभारण्याची मागणी ; नगरसेवक ऍड.मनोज भुजबळ यांचे महापौरांना निवेदन
Image