कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही...
पनवेल / (वार्ताहर): पळस्पे गावा शेजारील ऑटो कार गॅरेजलाभीषण आग लागून मोठे नुकसान झाले आहे. त्यात एक कार जळून खाक झाली असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे अग्निशामक दलाने सांगितले आहे.
ही घटना रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली, या घटनास्थळी शेजारी राहणाऱ्या गावकऱ्यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी अग्निशामक दलाला संपर्क केला. त्यानंतर अग्निशामक दल घटनास्थळी वेळेत पोहचून आग १ तासात आटोक्यात आणली. यामध्ये पनवेल महानगरपालिका अग्निशामक दल, सिडको अग्निशामक व जे डब्लू सी गोडाऊन अग्निशामक यांनी मोलाची कामगिरी बजावली .