कट्टा परिवारातर्फे साकारण्यात आलेला किल्ले तोरणा गड आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक - भाजप प्रदेश सरचिटणीस विक्रांत बाळासाहेब पाटील...
भाजप प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील...


पनवेल दि.१५(वार्ताहर): पनवेल शहरामध्ये विरुपाक्ष मंदिरासमोर   कट्टा परिवाराच्यावतीने साकारण्यात आलेला किल्ले तोरणा गड हा आजच्या तरुण पिढीसाठी मार्गदर्शक ठरले असे मत भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
       पनवेल शहरातील कट्टा परिवारा तर्फे साकारण्यात आलेल्या किल्ले तोरणा गडाला भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भेट देऊन उभारलेल्या किल्ल्याचे कौतुक केले. कट्टा परिवाराच्यावतीने पत्रकार संजय कदम यांनी त्यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी अनिमेष पटवर्धन, सौरभ रामधरणे, अमेय भातखंडे, सागर जोग, प्रभंजन गाडगीळ, निखिल खोंड, अनिमेष ओझे,  तन्मय समेळ, सुरभी खरे, कोमल कोळी, ऋचा कदम, ऐश्वर्या शेडगे, मेघना कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.फोटो: कट्टा परिवार तर्फे साकरण्यात आलेला किल्ले तोरणा गड
Comments