हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने 'आम्हाला गर्व हिंदुत्वचा' ग्रुप तर्फे आदिवासी बांधवांना विविध वस्तूंचे वाटप...
 आदिवासी बांधवांना विविध वस्तूंचे वाटप...


पनवेल दि.२०(संजय कदम): आम्हाला गर्व हिंदुत्वचा ग्रुप तर्फे हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने ईरसाळवाडी येथे  आदिवासी बांधवाना विविध वस्तूंचे वाटप नुकतेच करण्यात आले. 
        आम्हाला गर्व हिंदुत्वचा व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेनापक्ष प्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने एक कट्टर शिवसैनिकांचा संपूर्ण महाराट्राचा ग्रुप सामाजिक उपक्रम राबवत कार्यरत आहे, त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने नैसर्गिक आपत्तीग्रस्त गाव ईसालवाडी येथे २१ वा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. यावेळी आदीवासी बांधवाना ग्रुपतर्फे एक नवीन शर्ट, एक चादर व एक हजार रुपये  याप्रमाणे ४४ कुटूंबाना ग्रुपच्या वतीने मदत  करण्यात आली यावेळी  शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेल तालुका प्रमुख विश्वास पेटकर, उप महानगर प्रमुख लिलाधर भोईर, मोर्बे शाखा प्रमुख जगन्नाथ म्हात्रे, तसेच ग्रुप कमिटीचे सदस्य संतोष पाटील, लवेश म्हात्रे, दत्तात्रेय घुले, बाळासाहेब निकम, सुरेश वाडकर, सूर्यकांत कडू, रंजीत नरवणकर, दिलीप गावडे, भालचंद्र उकीर्डे, वासंती गोताड, संदीप गुरव, सोनिया पाटील उपस्थित होते.




फोटो: आदिवासी बांधवांना विविध वस्तूंचे वाटप
Comments
Popular posts
महापालिकेच्यावतीने बावन बंगला परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई...
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे होणार थाटात उद्घाटन...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका; 'बुके' नव्हे 'बुक' संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा...
Image
आईशा मदरसा तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न ...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास भोईर यांच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम ...
Image