पनवेल शहर पोलिसांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक ; मोबाइलसह रोख रक्कम असलेली हॅण्डबॅग मालकाकडे सुपूर्द...
   हॅण्डबॅग मालकाकडे सुपूर्द...

पनवेल दि.१९(संजय कदम): पनवेल शहर पोलिसांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत असून त्यांच्या पोलीस शिपायाला बेवारस स्थितीत मिळालेली हॅन्डबॅग त्यांनी सदर मालकाला संपर्क साधून परत केली आहे. 
    पनवेल शहर पोलीस स्टेशनचे नेमणुकीस असलेले पोलीस शिपाई सुखदेव वाणी हे रात्रपाळी कर्तव्यावर असताना त्यांना गार्डन हॉटेल येथे पहाटे एक वाजेच्या सुमारास एक हँड पर्स मिळून आली असता त्यांनी सदर पर्स उघडून पाहणी केली असता, त्यामध्ये काही रक्कम व विवो कंपनीचा मोबाईल व शरद रघुनाथ सावंत राहणार डोंबिवली ठाणे या नावाचे आधार कार्ड मिळून आले. शरद सावंत यांचा संपर्क क्रमांक वरती सुखदेव वाणी यांनी संपर्क करून  त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की ते स्वतः व त्यांचा कर्मचारी अजय बाळाराम  गायकर राहणार नारपोली ठाणे हे दोघे बाईकवरून पनवेल ते कळंबोली असा प्रवास करत असताना त्यांची हॅन्ड बॅग पडली असल्याचे त्यांनी सांगितल्याने. त्यानुसार अक्षय बाळाराम गायकर हे स्वतः पोलीस ठाण्यात येऊन त्यांनी त्यांचे मालक शरद रघुनाथ सावंत यांची हरवलेली बॅग ताब्यात घेऊन चेक केले असता त्यामध्ये त्यांनी ठेवलेले पंचवीस हजार रोख रक्कम विवो कंपनीचा मोबाईल व आधार कार्ड मिळून आले असून त्यांचा मुद्देमाल त्यांना मिळून आल्याने  सदरची हॅन्डबॅग त्यांच्या ताब्यात कर्तव्यावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक प्रियांका शिंदे यांच्या उपस्थितीत देण्यात आली. कर्तव्यदक्ष पोलीस शिपाई सुखदेव वाणी यांनी मिळून आलेली वस्तू प्रामाणिकपणे परत दिल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.



फोटो: हरवलेली हॅन्डबॅग परत करताना पोलीस अधिकारी व कर्मचारी
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image