जलाराम जयंती निमित्ताने श्री पनवेल लोहाणा युवा मंडळातर्फे मोफत कपडे व जिलेबीचे वाटप...
   मोफत कपडे व जिलेबीचे वाटप...

पनवेल दि.२०(संजय कदम):  जलाराम जयंती निमित्ताने पनवेल येथील श्री पनवेल लोहाणा युवा मंडळातर्फे मोफत कपडे व जिलेबीचे वाटप आज करण्यात आले. यावेळी शहरातील कोहिनुर टेक्निकल जवळील वसाहतीमधील रहिवाश्यांना तसेच नाका कामगारांना मोफत कपडे आणि जिलेबीचे वाटप करण्यात आले. 
यावेळी नाका प्रमुख नील पुजारा, उपप्रमुख आकाश ठक्कर, खजांची पार्थ चोथाणी, मीडिया मेंबर इशीता चोथाणी, रवी ठक्कर, अथर्व ठक्कर, धर्मेश ठक्कर, चिंतन ठक्कर अनिश रंगपरिया, ट्रस्टी सुनीतभाई ठक्कर, समीरभाई माखेचा, महाजन प्रमुख सुजाताबेन ठक्कर, महाजन उपप्रमुख दीपक भाई ठक्कर, महाजन सेक्रेटरी भाविनभाई ठक्कर, खजानची विशाल देवानी, मेंबर बिजलबेन ठक्कर, मेंबर निखिलभाई सोमैया, किरण चडादे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.  
फोटो: मोफत कपडे व जिलेबीचे वाटप
Comments