राज्यातील पोलीस पाटीलांच्या विविध मागण्यांसाठी उपोषणास बसलेल्या पोलीस पाटलांची आ. प्रशांत ठाकूर यांनी घेतली भेट ..
 आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतली भेट.. 

पनवेल दि. २९  (वार्ताहर ) : राज्यातील पोलीस पाटीलांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू आहे. भाजपचे मावळ लोकसभा प्रमुख व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या ठिकाणी मंगळवारी भेट दिली आणि पोलीस पाटीलांच्या मागण्यांसंदर्भात येत्या हिवाळी अधिवेशनात शासकीय स्तरावर लक्ष वेधण्याचे आश्वासन दिले. 
              यावेळी  महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाचे राज्यध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील ,राज्यसचिव कमलाकर मांगले , रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष दळवी तसेच महिलाध्यक्ष सरिताताई रणपिसे,  जिल्हा सचिव कुणाल लोंढे . जिल्हा सदस्य विजय खुटले तसेच नवी मुंबईअध्यक्ष संतोष गायकर, पनवेल तालुका पो.पा संघाचे  अध्यक्ष प्रमोद नाईक , उपाध्यक्ष  प्रदिप पाटील, खजिनदार निलेश गायकर ,  पांडुरंग जाधव, एकनाथ पाटील, मिलिंद पोपेटा, वसंत पाटील  सौ. मीनाक्षीताई पाटील, सौ. सुगंधाताई पाटील, शफीक शेख , मिनानाथ पाटील, प्रविण पाटील, राजेश जाधव, रायगड जिल्ह्याचे व पनवेल तालुक्याचे पदाधिकारी उपस्थित होते. 




फोटो  - आ. प्रशांत ठाकूर यांनी घेतली भेट
Comments