ग्रामीण भागात सत्ताधारी सरकार विरोधात एल्गार...
पनवेल दि. ०६ ( वार्ताहर ) : पनवेल तालुक्यात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या होऊ द्या चर्चा अंतर्गत ग्रामीण भागात सत्ताधारी सरकार विरोधात पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करतांना एल्गार केला. यावेळी माता भगिनींचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग होता .
होऊ द्या चर्चा अंतर्गत तालुक्यातील मोहदर , कुत्तारपाडा, ग्रामपंचायत शिरवली ,चिद्रन येथील ग्रामस्थांशी चर्चा करून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भाजपचा खोटारडेपणा जनतेसमोर आणला . वाढती महागाई , बेरोजगारी यावर चर्चा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, पनवेल तालुकाप्रमुख विश्वास पेटकर,उपतालुका प्रमुख शांताराम कुंभारकर,विभागप्रमुख प्रमोद पाटील,युवासेना विभागअधिकारी मनोज कुंभारकर ,युवासेना विभाग अधिकारी जीवन पाटील, शाखाप्रमुख मोहदर एकनाथ शिनारे ,शाखाप्रमुख कुत्तरपाडा बळीराम भोईर, जेष्ठ शिवसैनिक हिरामण भोईर, उपसरपंच सुजित पाटील, शाखाप्रमुख चिद्रण संतोष गडगे, ग्रामपंचायत सदस्य जीवन पाडेकर ,ग्रामपंचायत सदस्य आत्माराम पाटील,मा. उपसरपंच शंकर देशेकर, मधुकर पाडेकर यांनी केली यावेळी ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .
फोटो - होऊ द्या चर्चा अंतर्गत बैठका