पनवेल पोलिसांची धाडसी कारवाई ; नायजेरियन सायबर गुन्हेगारांना दिल्लीतून केले जेरबंद...
आ.प्रशांत ठाकूर यांनी केले पोलिसांचे कौतुक ..


पनवेल (प्रतिनिधी) अत्यंत गुंतागुंतीच्या सायबर गुन्हयाची शिताफीने आणि धाडसाने उकल करत सहा नायजेरियन सायबर गुन्हेगारांना दिल्लीतून जेरबंद करणाऱ्या पनवेल पोलीसांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (दि. २३ ऑक्टोबर) अभिनंदन व कौतुक केले. 
        सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख करत भेटवस्तूच्या आमिषाने पनवेलमधील एका महिलेची तब्बल ०३ लाख २५ हजार ५०० रुपयांची ऑनलाईन पद्धतीने नायजेरिन सायबर गुन्हेगारांकडून एक महिन्यापूर्वी आर्थिक फसवणूक झाली होती. त्या अनुषंगाने या गुन्ह्याची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन ठाकरे यांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस तपास यंत्रणा कार्यान्वित केली. ऑनलाईन सायबर गुन्हा असल्याने त्या संदर्भात योग्य तपास दिशा मिळण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेण्यात आली.  सायबर गुन्हेगार तांत्रिकदृष्ट्या अनेक आधुनिक उपकरणांची मदत घेऊन लोकांची आर्थिक फसवणूक करत असतात. त्यामुळे सायबर गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व्यूहरचना आखण्यात आली.  १८ पोलीस आणि सायबर तज्ञ् अशी टीम बनविण्यात आली. तपासाच्या अनुषंगाने गुन्हेगारांचे केंद्र दिल्ली जवळ असल्याचे या टीमच्या निदर्शनास आले. त्यानुसार गुन्हेगारांना पकडण्यासाठी पनवेलहून हि टीम दिल्लीला रवाना झाली. त्यांनी तब्बल दहा दिवस दिल्लीमध्ये शोध मोहीम घेतली. सायबर गुन्हेगार हे हत्यारांचा वापर करणारे असल्याची शक्यता दाट असते. त्यामुळे त्याची दक्षता घेणे गरजेचे असते. त्या अनुषंगाने पोलिसांच्या टीमने  तपास यंत्रणेला आपल्या चाणाक्ष्य बुद्धीने वेग दिला आणि मोठे धाडस करून सहा आरोपींना अटक केली. विशेष म्हणजे हे आरोपी सर्व नायजेरियन निघाले. पोलिसांच्या या टीमने केलेल्या कारवाईने सराईत सायबर गुन्हेगार तर जेरबंद झालेच त्याचबरोबर पोलिसांनी केलेल्या या धाडसी कामगिरीने पनवेल पोलिसांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन ठाकरे व त्यांच्या टीमचे विशेष कौतुक केले. 
          फसवणूक झालेल्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, १० ऑगस्ट २०२३ रोजी फेसबुकवर अतुल कुमार या नावाने अनोळखी व्यक्तीकडून आलेली फ्रेंड रिक्वेस्ट मान्य केली. त्यांनतर सोशल मीडियातून संपर्क वाढल्यानंतर अतुल कुमार नामक व्यक्तीने आपली पत्नी कोविडमध्ये मयत झाली असून आठ वर्षाची मुलगी असल्याचे सांगितले. दरम्यान युके देशातील नंबर वरून त्याने व्हाट्सअँप वर चॅटिंग सुरु केले. त्यानंतर मैत्रीबद्दल भेटवस्तू पाठवत असल्याचे सांगितले. मात्र त्यास नकार दिले होते. मात्र त्या व्यक्तीने तगादा लावला, त्यामुळे भेटवस्तू द्यायची असल्यास फक्त छोटीशी पर्स पाठविण्याबाबत कळविले त्यावेळी त्याने माझा पत्ता घेतला व भेटवस्तू पाठवत आल्याचे सांगितले. थोड्यावेळाने एक पार्सल बॉक्स मध्ये व एक पावतीचा फोटो व्हाट्सअँपवर पाठविला. त्यामध्ये सोने, युके करन्सी, आयफोन, परफ्युम्स व चॉकलेट दिसत होते. त्यानंतर त्या व्यक्तीने पार्सलसाठी कस्टम क्लिअरन्स फी म्हणून २५ हजार रुपये भरण्यास सांगून युके करन्सी हि रुपयांमध्ये ट्रान्सफर करून घे असे सांगितले मात्र सदरच्या दिवशी मी ते पैसे भरले नाहीत. त्यानंतर २३ सप्टेंबर २०२३ रोजी एका महिलेने आपण इंदिरा गांधी विमानतळावरून बोलत असल्याचे सांगून तुमचे युके वरून पार्सल कस्टम क्लिअरिंग फी साठी बाकी असल्याचे सांगितले. त्यामुळे मी २५ हजार रुपये क्लेअरिंग फी म्हणून तिने दिलेल्या बँक खात्यावर जमा केले. त्यानंतर पुन्हा एकदा त्या महिलेने पार्सल स्कॅनिंगमध्ये युके करन्सी असल्याने त्यासाठी ०१ लाख रुपये क्लिअरन्स फी भरावे लागतील असे सांगितले. अशा प्रकारे वेगवेगळ्या क्लुप्त्या करत एकूण ०३ लाख २५ हजार ५०० हजार रुपयांची फसवणूक झाली, असल्याचे सांगितले तसेच पोलिसांनी केलेल्या तपास कारवाईमुळे त्यांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image