शासनाच्या फसव्या योजनांविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पदाधिकाऱ्यांनी केला कळंबोली वसाहतीमध्ये पडदा फाश...
पदाधिकाऱ्यांनी केला कळंबोली वसाहतीमध्ये पडदा फाश...


पनवेल दि.१३(संजय कदम):  शासनाच्या फसव्या योजनांविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला कळंबोली वसाहतीमध्ये पडदा फाश केला असून नागरिकांनी या सरकारचा तीव्र निषेध केला. 
       शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार सरकारच्या बोलघेवड्या योजनांचा आता पडदा फाश करण्याची वेळ आली असून, फसव्या योजनांविरोधात 'होऊन जाऊ दे चर्चा' हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या गावागावात झाला पाहिजे, या अनुषंगाणे पनवेल जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या आदेशाने आणि कळंबोली निरीक्षक प्रदिप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने विधानसभा-१८८ मधील  कळंबोली शहरात सेक्टर १  भारत गॅस, आणि राजे शिवाजीनगर सेक्टर १येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी विधानसभा समन्वयक प्रदिप ठाकूर, शहरप्रमुख सूर्यकांत म्हसकर, शहरसंघटक अक्षय साळुंखे,उपशहरप्रमुख संजय भालेराव, उपशहरप्रमुख नरेंद्रसींग होठी, विभागप्रमुख महेश गुरव,शाखाप्रमुख महेश दिघे, उपविभाग प्रमुख दिपक शिंदे
महिला शहरसंघटिका ज्योती ताई मोहिते, शहर संपर्क प्रमुख रत्नमाला शिंदे, उपशहरप्रमुख मनीषा वचकल, जाधव ताई,निशा ताई, यांच्यासह कळंबोली शहरातील सर्व पदाधिकारी, महिला आघाडी,  शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 





फोटो: कळंबोली वसाहतीमध्ये होऊ द्या चर्चा कार्यक्रम
Comments