पनवेल शिवसेना विभाग उपशहर संघटक पदी सिद्धेश खानविलकर यांची नियुक्ती...
उपशहर संघटकपदी सिद्धेश खानविलकर ..

पनवेल वैभव / दि.२६(संजय कदम): हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पनवेल विभाग उपशहर संघटक पदी सिद्धेश खानविलकर यांची निवड करण्यात आली आहे. 
       याबाबतचे नियुक्तीपत्र जिल्हाप्रमुख रामदास वामनराव शेवाळे यांनी दिले असून शिवसेना महानगरप्रमुख ऍड.प्रथमेश सोमण यांनी हे पत्र आज सिद्धेश खानविलकर यांना प्रदान करून पुढील राजकीय वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या आहेत.  यावेळी शिवसेना महानगरप्रमुख ऍड.प्रथमेश सोमण, उपमहानगरप्रमुख महेश सावंत, पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे  आदींच्या उपस्थितीत हे नियुक्तीपत्र देण्यात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी या नियुक्तीपत्राद्वारे व्यक्त केला आहे. फोटो: सिद्धेश खानविलकर नियुक्ती
Comments