तरुणीच्या हत्या प्रकरणी मुख्य आरोपीचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आवाहन...
तरुणीच्या हत्या प्रकरणी मुख्य आरोपीचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आवाहन...पनवेल दि.१२(वार्ताहर): पनवेलमधील भिंगारी गावच्या हद्दीत सर्व्हिस रोडलगत एका महिलेची हत्या करून तिचा मृतदेह तेथील झुडपामध्ये टाकून देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. जयश्री पवार (१९) असे या महिलेचे नाव असून तिची हत्या करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. त्यामुळे आरोपींच्या मुसक्या आवळण्याचा मोठे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
       जयश्री ही महिला पेण जिल्ह्यातील जोगेश्वरी करदे पाडा भागात राहाणारी असून मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तिचा मृतदेह पनवेलमधील भिंगारी गावच्या हद्दीत पळस्पे ते शिवशंभो हायवे रोडलगत टाटा पॉवर कॅम्प कॉलनी येथील मोकळ्या जागेवर आढळून आला होता. पनवेल शहर पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. या महिलेची दोन दिवसांपूर्वी हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या दृष्टीने पनवेल शहर पोलिसांचे पथक व गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलचे पथक चोहोबाजूने तपास करत आहेत.
फोटो: मयत जयश्री पवार
Comments