डॉ.अनिल परमार हे यशस्वी गव्हर्नर : डॉ गिरीश गुणे..
निकम परमार हॉस्पिटल ने चांगली सेवा द्यावी : डॉ गिरीश गुणे..


पनवेल / प्रतिनिधी
पंचवीस वर्षांपूर्वी पनवेल सारख्या गावात अद्ययावत आय सी यू हॉस्पिटलडॉ  निकम डॉ अनिल परमार या दोन डॉक्टरांनी केली अतिशय चांगली सेवा या पंचवीस वर्षात डॉ निकम आणि डॉ अनिल परमार यांनी आजपर्यंत दिली पुढे हि अशीच रुग्ण सेवा द्यावी असे प्रतिपादन पनवेल चे लोकप्रिय डॉ गिरीश गुणे यांनी निकम परमार हॉस्पिटल च्या पंचविसाव्या वर्धापन दिनी आयोजित संजीवनी हेल्थ कार्ड च्या उदघाटन प्रसंगी  केले .

पनवेल मधील डॉ अनिल परमार आणि डॉ निकम यांनी पनवेल मध्ये पंचवीस वर्षांपूर्वी निकम परमार नावाने हॉस्पिटल सुरु केले , पंचविसाव्या वर्धापन  दिनानिमित्त निकम परमार हॉस्पिटल व  डॉ रणजित माळी यांच्या संकल्पनेतून संजीवनी हेल्थ कार्ड चे उदघाटन डॉ गिरीश गुणे यांच्या हस्ते करण्यात आले . 
यावेळी बोलताना डॉ गुणे म्हणाले कि हॉस्पिटल ने आत्तापर्यंत चांगली सेवा दिली आहे आज संजीवनी हेल्थ कार्ड चे उदघाटन झाले आहे हे कार्ड जे जे रुग्ण नोंदणी करतील त्या रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार  हॉस्पिटल करणार आहे,आपली  सेवा इतकी चांगली द्या कि पुढील वर्षी संजीवनी हेल्थ कार्ड चे नूतनीकर करून आपले उपचार सवलतीच्या दरात करून घेतील याचा नक्कीच पनवेलच्या रुग्णांना अधिक फायदा होईल असे हि डॉ गिरीश गुणे  यांनी सांगितले . पंचविसाव्या वर्धापन दिनानिमित्त  बोलताना  ते पुढे म्हणाले कि डॉ अनिल परमार हे अतिशय मेहनती आहेत सामाजिक काम करीत असताना कोविड सारख्या परीस्थित त्यांनी खुप  चांगले काम  केले आहे .  रोटरी गव्हर्नर  चेकाम  करीत  असताना २०० कोटी हुन अधिक निधी रोटरी फॉउंडेशन च्या माध्यमातून समाजसेवेसाठी  खर्च करून विविध उपक्रम राबवले .गेली वर्षभर पुणे पनवेल असा त्याचा प्रवास  होता या सामाजिक कामात त्यांची पत्नी हेमा परमार यांनी हि त्यांना मोलाची साथ दिली असे हि डॉ गुणे यांनी सांगितले  .
यावेळी डॉ अनिल परमार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मी जेव्हा  प्रॅक्टिस सुरु केली तेव्हापासून मला डॉ गिरीश गुणे यांचे मार्गदर्श लाभले आहे .माझे ते वैद्यकीय क्षेत्रातील गुरु आहेत .गेली दोन वर्षे रोटरी च्या कामात व्यस्त असल्याने मला हॉस्पिटल मध्ये वेळ द्यायला जमत न्हवता सकाळी ओ पी डी मग पुणे असा साधारण वर्षभर कार्यक्रम असायचा आता आमची नवीन टीम जमली असून डॉ रणजित  माळी सारखे डॉ आमच्या सोबत आहेत आणि आम्ही पनवेलच्या जनतेसाठी नव्या दमाने नवी नवी योजना घेऊन सेवेसाठी सज्ज आहोत .
या वेळी डॉ रणजित  माळी यांनी संजीवनी हेल्थ कार्ड वरील विविध उपचारांवर कितीकिती सवलत आहे याची माहिती दिली ,टूडी इको ,सोनोग्राफी ,लिपिड प्रोफाइल या चाचण्यांसाठी ५० %  सवलत तर अन्य उपचारासाठी १० % सवलत असे संजीवनी हेल्थ कार्ड धारकांना मिळणार असल्याची माहिती दिली ,या कार्ड च्या नोंदणीकरिता हॉस्पिटल मध्ये येऊन नोंदणी करावी असे आवाहन हि डॉ रणजित  माळी यांनी यावेळी केले .
या वेळी पनवेल डॉ असोसिएशन चे अध्यक्ष डॉ मोकल, यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते .
Comments