"शिवशौर्य यात्रा”चे पनवेलमध्ये भाजपच्यावतीने जोरदार स्वागत....
"शिवशौर्य यात्रा”चे पनवेलमध्ये भाजपच्यावतीने जोरदार स्वागत....


पनवेल / प्रतिनिधी :-
शिवराज्याभिषेक ३५० वे वर्ष व विश्व हिंदू परिषद षष्टीपूर्ती निमित्त विश्व हिंदू परिषद, बजरंग दल पनवेल प्रखंडच्या साथीने पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या "शिवशौर्य यात्रा”चे पनवेलमध्ये पनवेल भाजपच्या वतीने पुष्पवृष्टी, ढोलताशाच्या गजरात आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले.   या यात्रेची सुरुवात सिंधुदुर्ग येथून झाली असून त्याची सांगता शिवाजी पार्क मुंबई येथे होणार आहे. पनवेलमध्ये शिवशौर्य यात्रेचे आगमन तक्का झाल्यानंतर तिथून भारतीय जनता पार्टी पनवेल कार्यालय - छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुढे रोडपाली, कळंबोली- कामोठे असे मार्गक्रमण करत बाईक रॅली झाली. यावेळी पनवेलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image