पश्‍चिम महाराष्ट्र करंजाडे पनवेल आयोजित भव्य रक्तदान व महाआरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद...
 महाआरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद...


पनवेल, दि.2 (संजय कदम) ः पश्‍चिम महाराष्ट्र करंजाडे पनवेल यांच्यातर्फे आयोेजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान आणि महाआरोेग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून जवळपास 75 जणांनी रक्तदान केले आहे.
करंजाडे ग्रामपंचायत जिल्हा परिषद शाळेच्या सभागृहात सदर रक्तदान आणि महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोफत नेत्र तपासणी, ब्लड प्रेशर तपासणी, शुुगर तपासणी, हृदयाची ईजीसी तपासणी, हाडाची ग्रंथा, सीबीसी तपासणी व तज्ञ डॉक्टरांचा सल्ला यावेळी देण्यात आला होता. यासाठी सनराईज हॉस्पिटल करंजाडे, सीमीरा डायग्नोस्टीक्स करंजाडे, तेरणा मल्टीस्पेशालिटी आणि रिसर्च सेंटर नेरुळ, साई ब्लड बँक पनवेल यांनी विशेष सहभाग घेवून नियोजन केले होते. याचा लाभ मोठ्या प्रमाणात पश्‍चिम महाराष्ट्रातील करंजाडे येथे राहत असलेल्या नागरिकांनी घेतला. यासाठी डॉ.विक्रम पाटील, रामचंद्र महाडिक, ज्वालासिंग देेशमुख, सचिन गोरड, अमित कांबीरे, अजित कदम आदींनी विशेष मेहनत घेतली होती.



फोटो ः रक्तदान शिबीर
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image