पनवेल मधील मॉलमध्ये अवतरला 'विक्रम लँडर'...
पनवेल मधील मॉलमध्ये अवतरला 'विक्रम लँडर'...
पनवेल दि.३०(वार्ताहर): पनवेल भारताची यशस्वी चंद्रयान मोहिमेमुळे जगभरात डंका वाजला. देशाभिमान जागविणाऱ्या या मोहिमेतील विक्रम लँडरची हुबेहूब प्रतिकृती पनवेलमधील ओरियन मॉलमध्ये अवतरली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ओरियन मॉलने यावर्षी ही नवीन थीम साकारली आहे. दरवर्षी मॉल प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जपली जाते. मागील वर्षी साकारलेली आयएनएस विक्रमची प्रतिकृती पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी मॉलला भेट दिली होती.
       नागरिकांचा प्रतिसाद पाहता तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हीच प्रतिकृती ट मंत्रालयात प्रदर्शनासाठी ठेवले होते. त्यामुळे पुन्हा एकदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विक्रांत लँडरची प्रतिकृती दिवाळीचे विशेष आकर्षण असणार असल्याची माहिती ओरियन मॉलचे मालक मंगेश परुळेकर यांनी दिली. या विक्रम लँडरची प्रतिकृती उभारण्यास लाखो रुपयांचा खर्च आला आहे. दिवाळीनिमित्त संपूर्ण ओरियन मॉललादेखील आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.



फोटो: विक्रम लँडर
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल दगडी शाळा येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना छत्री व वह्या वाटप कार्यक्रम संपन्न...
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
पनवेलला वैभव लाभायचे असेल तर अतिक्रमण पूर्व दक्षता कमिटी स्थापन करावी - शिवसेना सल्लागार रमेश गुडेकर...
Image
पनवेल येथे ECHS पॉलीक्लिनिक स्थापन करण्यासाठी माजी सैनिक संघटनांची मागणी...
Image