वायरींगच्या शॉर्टसर्किट मुळे स्कूल व्हॅनला लागली अचानक आग...
वायरींगच्या शॉर्टसर्किट मुळे स्कूल व्हॅनला लागली अचानक आग...


पनवेल दि.१३(संजय कदम): स्कूल  व्हॅन मधील वायरिंगच्या शॉर्टसर्किटमुळे आज दुपारी पनवेल शहरातील आदर्श नाका येथे भर रस्त्यात एका स्कूल व्हॅनला अचानक आग लागल्याने परिसरात गोंधळ उडाला होता. 
स्कूल व्हॅनचालक मंगेश पाटील हे त्यांच्या ताब्यातील स्कूल व्हॅन क्र.एम एच ४६ जे ०६०९ ही घेऊन पनवेल ते भिंगारी असे जात असताना आदर्श नाका येथे त्यांच्या गाडीमधील वायरींगच्या शॉर्टसर्किटमुळे गाडीला आग लागून धूर येऊ लागला. मंगेश पाटील यांच्या हे लक्षात येताच त्यांनी गाडी त्वरित थांबवून गाडी मध्ये असलेल्या अग्निरोधक बाटल्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी आजूबाजूला असेलेल्या नागिरकसुद्धा त्यांच्या मदतीला धावून गेले. दरम्यानच्या काळात पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचा बंब सुद्धा घटना दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले.




फोटो: स्कूल व्हॅनला लागलेली आग
Comments
Popular posts
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image
स्वीकृत नगरसेवक पदी प्रथमेश सोमण यांच्या नावावर शिक्कामोर्तब...
Image