नवरात्रोत्सव साजरा करावा - वपोनि नितीन ठाकरे
पनवेल दि.१३(संजय कदम) : सर्व शासकीय नियमांचे पालन करून व संबंधित विभागाकडील परवानग्या घेऊन नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करावा असे आवाहन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी नवरात्रो उत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांच्या आयोजित बैठकीत केले.
या बैठकीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, गुन्हे पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, प्रशाकीय पोलीस निरीक्षक प्रवीण भगत, गोपनीय विभागाचे अधिकारी संजय धारेराव यांसह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीमध्ये नवरात्र उत्सव पदाधिकाऱ्यांना मंडपाचे जागेबाबत महानगरपालिका, वाहतूक शाखा व इतर संबंधित विभागाकडील परवानग्या घेणे, मूर्ती स्थापना, आगमन व विसर्जन मिरवणुकी संदर्भातील सूचना देऊन उत्सवा दरम्यान कोणीही डीजे डॉल्बीचा वापर करू नये, आक्षपार्ह बॅनर्स, देखावे न करणे, दुर्गा मूर्तीचे मंडपामध्ये दिवसा व रात्री स्वयंसेवक नेमणे, महिलांची छेडछाड होणार नाही यासाठी तसेच गरबा खेळत असताना स्वयंसेवक नेमणे, गरब्याचे ठिकाणी तसेच मूर्तीचे आजूबाजूला मंडप परिसरामध्ये सीसीटीव्ही लावणे तसेच अग्निशमन यंत्र लावणे, आगमन विसर्जन मिरवणुकीत तसेच गरबा दांडिया दरम्यान लेझर लाईट्स वापरू नये, पूर्व परवानगी शिवाय ड्रोन वापरू नये या बाबतच्या सूचनादेण्यात आल्या.
फोटो: नवरात्रो उत्सव बैठक