भरधाव ब्रीझा गाडी नाल्यात कोसळली ; 2 ठार 3 जखमी..
भरधाव ब्रीझा गाडी नाल्यात कोसळली ; 2 ठार 3 जखमी..


पनवेल, दि.16 (वार्ताहर) ः पनवेल तालुक्यातील चिंचवण गावाच्या हद्दीत भरधाव वेगाने जाणार्‍या ब्रीझा गाडीच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने सदर गाडी विरुद्ध दिशेला जावून खोल नाल्यात कोेसळल्याने आज झालेल्या अपघातात गाडीतील 2 जण गंभीररित्या जखमी होवून मयत झाले आहेत तर 3 जण जखमी झाले असून त्यांना एम.जी.एम. कामोठे येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
सानपाडा येथे राहणारे जीवन पाटील (52), रमेश पाटील (40), ज्ञानेश्‍वर पाटील (56), मनिष पाटील (35) व चालक विलास पाटील (43) हे आज त्यांच्या ताब्यातील सफेद रंगाची ब्रीझा गाडी घेवून पेण येथील देवीच्या दर्शनाला जात असताना पनवेल-गोवा महामार्गावरील चिंचवण गावाच्या हद्दीत साईकृपा ढाब्याच्या जवळ गाडी चालकाचा ताबा सुटल्याने गाडी विरुद्ध दिशेला जावून तेथील असलेल्या खोल नाल्यात गाडी पडली. या अपघातात जीवन पाटील व रमेश पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर इतर 3 जण जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments