शिवसेनेच्या पुढाकाराने ७५ नंबर सिटीबसच्या फेऱ्या सोमवार पासून वाढणार...
शिवसेनेच्या पुढाकाराने ७५ नंबर सिटीबसच्या फेऱ्या सोमवार पासून वाढणार...
पनवेल वैभव / दि.१६(संजय कदम): पनवेल शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी जी ७५ नंबरची सिटी बस सेवा सुरू आहे. काही दिवसांपासून त्या बसच्या फेऱ्या अतिशय कमी प्रमाणात होऊ लागल्याची तक्रार साईनगर भागातील काही रहिवाशांनी शिवसेनेकडे केली होती. त्यानुसार पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे यांनी पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला आहे.
      पनवेल शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी ७५ नंबरची सिटी बस सेवा सुरू आहे. काही दिवसांपासून त्या बसच्या फेऱ्या अतिशय कमी प्रमाणात होऊ लागल्याची तक्रार साईनगर भागातील काही रहिवाशांनी शिवसेनेकडे केली. ज्यामुळे त्यांना रिक्षासाठी अतिरिक्त पैसे खर्च करून रेल्वे स्टेशन गाठावे लागते. याच भागातील रहिवासी व सुजाण नागरिक योगेश गोरे यांनी या संदर्भात आसूडगाव आगारातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत तक्रार देखील केली. परंतु संबंधित विभागाकडून अपेक्षित कारवाई झाली नाही. ही बाब त्यांनी पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे यांच्याशी संपर्क करून निदर्शनास आणून दिली. 
सदर विषयाची चर्चा करण्यासाठी त्यांनी व प्रभाग १४ चे शाखाप्रमुख.प्रतीक वाजेकर, प्रभाग क्रमांक १९ शाखाप्रमुख अविनाश साफल्य यांनी आसूडगाव आगारातील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली व त्यांनी येत्या सोमवारपासून त्या मार्गावरील बसच्या फेऱ्या वाढवून देऊन बस सेवा सुरळीत करून देण्याचे कबूल केले व तसेच भविष्यात प्रवाशांना अशा प्रकारचा त्रास होणार नाही असे आश्वासन दिले.फोटो: सिटीबस चर्चा
Comments
Popular posts
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
शिवसेनेच्या आवाहनानंतर पोलीस व एमएसईबी अधिकाऱ्यांनी केलेल्या आवश्यक बाबींच्या पूर्ततेमुळे विसर्जन सुरळीत ...
Image
रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत दप्तरवीना शाळा उपक्रम संपन्न...
Image
मनिषा घाडगे -खांडे यांची आध्यात्मिक छाप ; प्रवचन कीर्तन प्रशिक्षण 'अ' श्रेणी प्राप्त करून पूर्ण..
Image