मनिषा घाडगे -खांडे यांची आध्यात्मिक छाप ; प्रवचन कीर्तन प्रशिक्षण 'अ' श्रेणी प्राप्त करून पूर्ण..
 प्रशिक्षण 'अ' श्रेणी प्राप्त करून पूर्ण..
पनवेल दि.१८(वार्ताहर): लहानपणापासूनच अध्यात्माचे बाळकडू  घेतलेल्या कीर्तनकार मनिषा घाडगे- खांडे यांनी या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केला आहे. विशेष म्हणजे नुकतेच पार पडलेले किर्तन प्रवचन प्रशिक्षण त्यांनी अ श्रेणी प्राप्त करून यशस्वीरित्या पूर्ण केले. याबद्दल वारकरी संप्रदायातील संत महात्मे, कीर्तनकार, प्रवचनकार त्याचबरोबर या क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
      ह .भ .प सुभाष महाराज घाडगे यांचा आध्यात्मिक वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम ह. भ.प मनिषा घाडगे- खांडे करीत आहेत. न्यू  इंग्लिश हायस्कूल  कळंबोलीच्या विद्यार्थिनी असणाऱ्या घाडगे- खांडे या उच्चशिक्षित आहेत. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम हाती घेतले आहे. किर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधन त्या करीत आहेत. संत वाड्मयाच्या  अभ्यासक तसेच भगवद्‌गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा यामध्येही त्यांचा अभ्यास आहे. अभंग, गवळणी, भारुड आत्मसात करून सामाजिक विषयांवर जनजागृती करण्याचे कामही त्या कीर्तन आणि प्रवचनातून करतात. 
सेवासुर्य चॅरिटेबल ट्रस्ट  सेवा सूर्य गुरुकुलम त्या चालवतात. तेथेही ज्ञानदानाचे काम केले जात आहे. विश्व मराठी परिषद, किर्तनविश्व, आणि भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम यांच्या वतीने किर्तन प्रवचन अभ्यास वर्ग 2003  संपन्न झाला. यामध्ये ह.भ.प  घाडगे- खांडे यांनी यांनी अ श्रेणी मिळवून यश संपादन केले. प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या यशाबद्दल विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळाच्या सदस्य प्रमिला आहेर यांनी त्यांचे अभिनंदन केले.

फोटो: मनीषा घाडगे-खांडे
Comments