भाजपा ओबीसी मोर्चाच्या कोकण विभाग प्रदेश उपाध्यक्षपदी ऍड.मनोज भुजबळ यांची नियुक्ती...
मा.नगरसेवक ऍड.मनोज भुजबळ यांची नियुक्ती...

पनवेल दि.२६ (संजय कदम): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या  कोकण विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक ऍड.मनोज भुजबळ यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय गते यांनी केली आहे. 
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराने प्रेरित होऊन राज्याचे लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी मोर्च्याचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय गते यांनी ओबीसी सेलच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये पनवेल महापालीकेचे माजी नगरसेवक तथा पनवेल बार कौन्सिलचे अध्यक्ष ऍड. मनोज भुजबळ यांची  कोकण विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीनंतर प्रदेशाध्यक्षांनी, प्रदेश पदाधिकारी होऊन आपण भारतीय जनता पक्षाला ताकद मिळवुन देण्यासह पक्षाची ध्येय धोरणे विचार तथा पक्षाचे काम तळागळातील सर्व सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे काम कराल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दरम्यान  कोकण विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल मा. नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 



फोटो: ऍड. मनोज भुजबळ
Comments