ट्रँकरची मोटारसायकलीस धडक ; एक ठार एक जखमी...
पनवेल दि. २१ ( वार्ताहर ) : भरधाव पाण्याच्या ट्रॅकरने मोटारसायकलीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील तरुणीचा गंभीररित्या जखमी होऊन मृत्यू झाला आहे . तर मोटारसायकल चालक जखमी झाला आहे . या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
शहराजवळील वडघर खाडी पुलाच्या हद्दीत रात्रीच्या वेळी पाण्याचा ट्रॅकर भरधाव वेगाने जात असतांना त्यावरील चालकाने मोटारसायकलीस जोरात धडक देऊन झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील तरुणीचा गंभीररित्या जखमी होऊन मृत्यू झाला आहे . तर मोटारसायकल चालक जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.