बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड प्रत्यके शिवसैनिकांनी घराघरात जाऊन केला पाहिजे- पुणे संपर्क प्रमुख व आ.सचिन अहिर
 पुणे संपर्क प्रमुख व आ.सचिन अहिर..

पनवेल दि.१६(वार्ताहर):  बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड प्रत्यके शिवसैनिकांनी घराघरात जाऊन केला पाहिजे यासाठी आज पासूनच सर्वानी कामाला लागून आगामी गणेशोत्वसाच्या काळामध्ये घराघरात जाऊन ज्येष्ठ नागिरकांची भेट घेऊन  भ्रष्टाचार लोकांसमोर मांडा असे आवाहन शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे  पुणे संपर्क प्रमुख व आ.सचिन अहिर यांनी आज पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित ‘होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित पनवेलकरांना व शिवसैनिकांशी संवाद साधताना केले. 
      यावेळी  शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे  पुणे संपर्क प्रमुख व आ.सचिन अहिर यांच्यासह संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, जिल्हा समन्व्यक अनिल चव्हाण, जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, महानगर प्रमुख एकनाथ म्हात्रे, रायगड जिल्हा वक्ता सुवर्णा वाळुंज, महानगर समन्व्यक दीपक घरत, पनवेल विधानसभा संघटक दीपक निकम, पनवेल महानगर संघटक शशिकांत डोंगरे, मा नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, मा नगरसेवक गणेश कडू, तालुका प्रमुख विश्वास पेटकर, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, युवासेना उत्तर रायगड जिल्हा अधिकारी पराग मोहिते, उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत, पनवेल शहर संपर्क संघटक अर्चना अनिलकुमार कुळकर्णी, रुही सुर्वे, नविन पनवेल उपशहर संघटिका मालती राजेश पिंगळा, कळंबोली शहर संघटक ज्योती मोहिते, पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव, संघटक राकेश टेमघरे, नवीन पनवेल शहर प्रमुख यतीन देशमुख, खांदा वसाहत शहर प्रमुख सदानंद शिर्के, कामोठे शहर प्रमुख राकेश गोवारी, कळंबोली शहर प्रमुख सूर्यकांत म्हसकर, खारघर शहर प्रमुख गुरुनाथ पाटील आदींसह पदाधिकरी उपस्थित होते. यावेळी बोलताना शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पुणे संपर्क प्रमुख व आ.सचिन अहिर यांनी सांगितले की, पीक विमा योजना असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असो, बेरोजगारी, वाढती महागाई, स्मार्ट सिटी या फेल ठरलेल्या योजने विषयी सरकारला जाब विचारला पाहिजे. त्यासाठी केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या सरकार विरुद्ध जनजागृती करणे गरजेचे आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आत्ता आपण घराघरात जाऊन हा भ्रष्टाचार सांगितला पाहिजे. याची चर्चा झाली पाहिजे या सरकारला याचा जाब विचारला पाहिजे, यासाठी जनतेने पेटून उठणे गरजेचे आहे. देशाचा इतिहास बदलण्याचे काम हे  सरकार करत आहे. परंतु पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्रित आणून त्यांची मोट बांधली आहे. त्यामुळे केंद्र व राज्यतील सरकार हवालदील झाले असून लवकरच सत्ताबदल होईल असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 
तर यावेळी बोलताना संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांनी सांगितले की, समाजात तेढ निर्माण करण्याचे काम हे सरकार करत आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न असो किंवा वाढती महागाईचा प्रश्न, लोकांना फसवण्याचा काम या मिंदे सरकारने केले असल्याचे सांगिलते. तर यावेळी जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला यांनी सांगितले की, भ्रष्टाचाराने बरबटलेले हे सरकार असून ईडी व इतर सरकारी यंत्रणा आपल्या मनाप्रमाणे राबवून नेत्यांना वेठीस धरण्याचे काम हे करीत आहेत. परंतु जनता आता सर्व ओळखून असल्याने आगामी निवडणुकीत बदल हा निश्चित असल्याचे सांगितले. तर रायगड जिल्हा वक्ता सुवर्णा वाळुंज यांनी सांगितले की, आज महिलांना वाढत्या महागाईला सामोरे जावे लगत आहे. करोना काळामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले काम हे संपूर्ण देशाने बघितले आहे. त्यामुळे त्यांच्यावर घरी बसल्याचे आरोप करणे चुकीचे आहे. आगामी काळामध्ये देशात व राज्यात बदल हा निश्चित आहे. केंद्र आणि राज्यातील सरकार हे मूलभूत प्रश्नांना बगल देण्याचे काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मोठ्या प्रमाणात पनवेलकर होऊ द्या चर्चे मध्ये सहभागी झाले होते.


फोटो: होऊ द्या चर्चा
Comments