५ कोटी ४१ लाखाचा मुद्देमाल हस्तांतरित...
पनवेल दि.१४ (संजय कदम) : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत झालेल्या विविध गुन्हयांत आरोपीकडुन हस्तगत करण्यात आलेले ५ कोटी ४१ लाख २७ हजार सहाशे त्रायाऐंशी इतक्या किमतीचा मुददेमाल आज आमदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, आमदार महेश मालदी आणि पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नागरिकांना उपस्थितीत करण्यात आले.
वाशी येथील सिडको ऑडीटोरियम व एक्झीबिशन मध्ये सदर कार्यक्रमात जानेवारी २०२२ ते जुलै २०२३ पर्यंत नवी मुंबई पोलीसांनी मालमत्तेविरोधातील गुन्हयांत आरोपीकडुन हस्तगत करण्यात आलेले २ कोटी ९ लाख २३ हजार तीनशे चौऱ्याऐंशी इतक्या किमतीचे सोने व रोख रक्कम एकुण ७४ फिर्यादींना तर ३ कोटी ३२ लाख ४ हजार नव्यानऊ इतक्या किमतीचा वाहन, मोबाईल, व इतर सर्वसाधारण मुददेमाल १७४ फिर्यादींना असे एकुण २४८ फिर्यादींना रु. ५ कोटी ४१ लाख २७ हजार सहाशे त्रायाऐंशी इतक्या किमतीचा मुददेमाल परत करण्यात आला. यावेळी मुददेमाल परत मिळालेल्या फिर्यादी पैकी काही फिर्यादींनी मनोगत व्यक्त करून नवी मुंबई पोलीसांचे आभार मानले. यावेळी पोलीस सहआयुक्त संजय मोहिते, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमित काळे, परिमंडळ - १ पोलीस उप आयुक्त विवेक पानसरे, परिमंडळ २ पोलीस उप आयुक्त पंकज डहाणे यांच्यासह नवी मुंबई पोलीस दलातील अधिकारी व अमंलदार उपस्थित होते.
फोटो : ५ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या मुद्देमालाचे हस्तांतरण