पनवेलकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे हे महत्वाचे ठरणार -आ.प्रशांत ठाकूर....
सीसीटीव्ही कॅमेरे हे महत्वाचे - आ.प्रशांत  ठाकूर....

पनवेल दि.१२ (संजय कदम): पनवेलकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शहरामध्ये गर्दीच्या व महत्वाच्या ठिकाणी पनवेल शहर पोलीस ठाण्याच्यावतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे कॅमेरे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बाजवणार असल्याचे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात भेट देऊन सीसीटीव्ही कंट्रोल रूमची पाहणी करते वेळी केले. तत्पूर्वी आमदार प्रशांत ठाकूर यांचे वपोनि नितीन ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आ. प्रशांत ठाकूर यांच्यासोबत उमेश इनामदार व प्रकाश खैरे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
       पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना पनवेल शहर परिसरात गर्दीच्या ठिकाणी सद्य स्थितीत बसवण्यात आलेल्या ४४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आणि त्यांचा कंट्रोल रूम पनवेल शहर पोलीस ठाण्यात नैमुद्दीन शेख (रिंटू) सीसीटीव्ही टेक्निशयन यांच्या माध्यमातून बसवण्यात आल्याची माहिती दिली. तसेच आधुनिक पद्धतीने या वॉर रूम मध्ये आगामी काळात स्पीकर यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याद्वारे एखाद्या ठिकाणी गर्दी झाल्यास किंवा कोणती दुर्घटना घडल्यास या कंट्रोल मधूनच स्पीकरच्या माध्यमातून पोलीस मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथमच पनवेलमध्ये राबवला जाणार असल्याची माहिती वपोनि नितीन ठाकरे यांनी दिली. त्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कंट्रोल रूमची पाहणी केली. शहरातील गर्दीची ठिकाणे, बाजारपेठ, सराफ बाजार, मिरची गल्ली, आदी ठिकाणच्या वाहतूक कोंडी संदर्भात सुद्धा चर्चा झाली व लवकरच वाहतूक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आगामी सणासुदीच्या काळामध्ये शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे पनवेल शहरात अजूनही जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज असल्याने यांसंदर्भात सुद्धा आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन सुद्धा त्यांनी यावेळी दिले.




फोटो : सीसीटीव्ही कंट्रोल रूमची पाहणी करताना आ.प्रशांत ठाकूर
Comments
Popular posts
मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....
Image
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...
Image
कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक...
Image
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी...
Image
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती महोत्सव उत्साहात संपन्न ...
Image