तरुणाच्या हत्येने पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात खळबळ....
तरुणाच्या हत्येने पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात खळबळ....

पनवेल दि.०८ (संजय कदम) : पनवेल रेल्वे स्टेशन जवळील मालधक्का परिसरात आज पहाटेचे ४ च्या सुमारास एका २७ वर्षीय तरुणाची अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून धारदार व तीक्ष्ण हत्याराने हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 
                 पनवेल शहरातील टिळक रोड, ओम बेकरी समोर राहणाऱ्या विकी चिंडालिया (वय २७) या तरुणाची अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन धारदार व तीक्ष्ण हत्याराने हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, गुन्हे शाखा कक्ष २ चे वपोनि रवींद्र पाटील यांच्यासह गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी रवाना झाले. यावेळी पोलिसांना सदर मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. तसेच त्याच्या महत्वाच्या वस्तू आजूबाजूमध्ये पडलेले आढळल्या आहेत. पनवेल शहर पोलिसांनी एवढ्या सकाळी तो या ठिकाणी का आला होता? त्याला कोणी बोलावले होते का? यादृष्टीने पनवेल शहर पोलीस तपास करीत आहेत. पनवेल रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच हत्या झाल्याने आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान पनवेल शहर पोलिसांकडे आहे.
फोटो : मयत विकी चिंडालिया
Comments