वाढत्या प्रदूषणासंदर्भात शिवसेना पनवेल जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांचे महाराष्ट्र प्रदूषण बोर्डाला निवेदन....
 महाराष्ट्र प्रदूषण बोर्डाला निवेदन....


पनवेल दि.१८ (वार्ताहर):  तळोजा औद्योगिक क्षेत्रामधून सध्या प्रदूषणाचे प्रमाण वाढत असल्याचे आढळले आहे . प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रात चर्चा आहे. त्यामुळे या वाढत्या प्रदूषणासंदर्भात शिवसेना पनवेल जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांनी महाराष्ट्र प्रदूषण बोर्डाला दिले निवेदन देत आठवड्याभरात कारवाई करा अन्यथा मोर्चा काढू असा इशारा देण्यात आला.
      शिवसेना पनवेल पक्षाने केलेल्या एका निरीक्षणामार्फत असे आढळून आलेले आहे की, तळोजा एमाडिसी च्या लगत असलेल्या सर्व परिसरामध्ये वायरल केसेस चे प्रमाण  झपाटणे वाढत आहे. प्रदीर्घ खोकला ताप, डोके दुखणे असे विविध तक्रारी घेऊन नागरिक डॉक्टरांकडे धाव घेत आहेत. तज्ञांकडून चौकशी केल्यास असे निदर्शनास आले की वायरल केसेस आणि प्रदूषण याचा थेट संबंध असून, शिवसेना पनवेल पक्षाने तळोजा एमआयडीसी मधील परिसराचा पूर्ण सर्वे  केला. महाराष्ट्र शासनाने कोट्यावधी खर्च करून तळोजा व कळंबोली येथील सतत सभोवतालची हवा गुणवत्ता निरीक्षण युनिट च्या माध्यमातून उपलब्ध असलेले प्रदूषणाचे आकडे अत्यंत धक्कादायक असून त्याबाबत, महाराष्ट्र प्रदूषण बोर्डाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे 
यांनी बेलापूर कार्यालयात यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. तसेच एका आठवड्यात कारवाही करा अन्यथा कंपन्यांवर टाळे बंद मोर्चे काढू असा इशारा सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे  विभागीय अधिकारी सतीश पडवळ व तळोजा विभागाचे अधिकारी विक्रांत भालेराव यांना दिला. यावेळी शिवसेनेचे महानगर संघटक मंगेश रानवडे, शहर संघटक इम्तियाज शेख, विभाग संघटिका ज्योती नाडकर्णी, विभाग प्रमुख मुनाफ शेख, झोयेब शेख, शाखाप्रमुख फैयाज नगाणी आदी उपस्थित होते.फोटो: निवेदन
Comments