जीवनावश्यक वस्तू आणि धान्याचे वाटप....
पनवेल दि.०५(संजय कदम): महाराष्ट्र शासनाच्या महसूल सप्ताह "एक हात मदतीचा' या कार्यक्रमाअंतर्गत पनवेल मधील नामवंत उद्योजक व पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इक्बाल काझी यांच्या हस्ते व त्यांच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत झालेल्या शेकडो कुटुंबियांना जीवनस्व्हयक वस्तूंसह धान्यांचे वाटप करण्यात आले.
मौजे पोयंजे येथे उद्योजक व पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इक्बाल काझी यांच्यावतीने जुलै २०२३ मध्ये अतिवृष्टीमुळे अंशत: पडझड झालेल्या कुंटुंबाना महसूल अधिकारी, महसूल कर्मचारी व काझी ट्रेडींग कंपनी यांचे संयुक्त विद्यमाने एक महिना पुरेल अशा जिवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. यामध्ये गहू, तांदूळ, चहा पावडर,साखर,चणाडाळ, मुगढाळ, रवा, पोहे, लालमिरची, मिठ, जिरेमोरी, हळद, मसाले, कांदा, लसून, बटाटे, चवळी, मूग, मटकी, जमिनीगोडेतेल, खोबरेतेल या साहित्यांचा समावेश होता.या त्यांच्या सहकार्याबद्दल शासनातर्फे इक्बाल काझी यांचे कौतुक करण्यात आले. त्याचप्रमाणे शासनातर्फे पारगांव डुंगी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भरावाच्या कामामुळे मान्सून कालावधीत नांगरिकांच्या घरात पाणी जाऊन मोठया प्रमाणात नुकसान होते. त्याअनुषंगाने सिडकोमार्फत सदर नागरिकांना ४ महिने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी देय रक्कम रुपये ५०,०००/-प्रमाणे प्रत्येकी एकुण ११३ कुटुंबांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. तर मौजे कुंडेवहाळ येथे आदिवासी बांधवाना एकुण ३५ जातीचे दाखले वाटप करण्यात आले. आदिवासी बांधव व ग्रामस्थांसाठी आरोग्य तपासणी शिबीर लावण्यात आले असून त्यामध्ये ३०० ग्रामस्थांनी सदर शिबीराचा लाभ घेतला. ३) १० वी व १२ वी परिक्षेत उर्तीण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला तसेच शालेय लेखन व साहित्य वाटप करण्यात आले. तसेच पनवेल तालुक्यातील अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या मौजे नेरे कातकरवाडी, करंजाडे कातकरवाडी, नांदगांव कातकरवाडी, आपटेगांव, करंबेळी तर्फे तळोजे येथील एकुण ४५ कुंटुंबांना वरील सर्व साहित्यांचे वाटप करण्यात आले.
तसेच मौजे कर्नाळा, कासारभट, चिखले येथे पिक विमा उतरवण्याकरिता आवश्यक असणाऱ्या पिक पिरे, तसेच आठ अ, व ७/१२ वितरण ई-पिक पहाणी व ई-चावडीचे प्रशिक्षण देण्यात आले. आणि मौजे पोयंजे कातकरवाडी, कुंडेवहाळ येथे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येणाऱ्या योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.
फोटो: जीवनावश्यक वस्तू