ग्रीन हाऊस व फॅब्रिकेशनसाठी लागणारे लाखो रुपये किमतीचे पाईप चोरणाऱ्या त्रिकुटाला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड...
पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड...
पनवेल दि.१७(संजय कदम): फॅब्रिकेशनसाठी लागणारे लाखो रुपये किमतीचे पाईप चोरणाऱ्या त्रिकुटाला पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्या कडून टाटा कंपनीच्या पिकअप टेम्पो सह अठरा लाख रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला आहे. 
      तालुकयातील  चिखले गावाच्या हद्दीत असलेल्या इक्रा स्टील अँड ट्यूब्स प्रा. लि. कंपनीच्या गोडाऊन मधून जानेवारी २०२३ ते आजपर्यंत अज्ञात आरोपींनी जवळपास २६ लाख ३७ हजार रुपये किमतीचे ग्रीन हाऊस व  फॅब्रिकेशनसाठी वापरण्यात येणारे अठ्ठावीस टन वजनाचे जी. आय. व एम. एस. वेगवेगळ्या आकाराचे व लांबीचे पाईप चोरीस गेल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात येताच वपोनि अनिल पाटील व पोनि (गुन्हे)  जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे, पोलीस हवालदार महेश धुमाळ, पोलीस हवालदार सुनील कुदळे, पोलीस हवालदार विजय देवरे व पोलीस शिपाई आकाश भगत आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे येथील गोडाऊनचे सुपरवायजर जयकुमार तिवारी (वय ४७) याने त्याचे सहकारी मुकेश पटेल (वय २२),  लालाराम पटेल (वय २३) व अजून दोन आरोपी यांनी संगनमताने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न केल्याने यातील तीन आरोपींना गुन्ह्यात वापरलेल्या पिकअप टेम्पो सह चोरलेला माल असा मिळून अठरा लाख चौदा हजार तीनशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दरम्यान दोन फरार आरोपींचा शोध पनवेल तालुका पोलीस करीत आहेत.

फोटो - चोरीस गेलेले  ग्रीन हाऊस व फॅब्रिकेशनसाठी पाईप
Comments
Popular posts
एकता मित्र मंडळ लाईन आळी तर्फे होलिकोत्सव व संत तुकाराम महाराज बीज निमित्त सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन...
Image
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नगरसेवक मनोज भुजबळ यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट..
Image
गोदरेज प्रॉपर्टीजचा एक लाख घरांच्या विक्रीचा टप्पा पूर्ण ; कुटुंबाला मोफत घराची अनोखी भेट..
Image