करंजाडेकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी सिडकोवर जलआक्रोश मोर्चा..
पावसाळ्यात करंजाडे वसाहतीच्या घशाला कोरड....
पनवेल/प्रतिनिधी :-- भर पावसाळ्यात करंजाडे वसाहतीला तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. करंजाडे वसाहतीत मागणीप्रमाणे पाणी मिळत नसल्याने पाण्याचा प्रश्न जटील बनला आहे. याबाबत करंजाडेकर आक्रमक झाले असून 29 ऑगस्ट 2023 रोजी करंजाडेकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी सिडकोवर जलआक्रोश मोर्चा सिडको कार्यालयावर काढण्यात आला असल्याची माहिती माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी करंजाडे सेक्टर 6 येथील झालेल्या बैठकीत दिली.

करंजाडे सेक्टर 6 येथील कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये माजी सरपंच रामेश्वर आंग्रे, चंद्रकांत पाटील माजी पोलीस अधिकारी, शिवसेना उपशहरप्रमुख संदीप भास्कर, सईद दादण, हेमा गोटमारे, अर्चना बनावली, मधुरा पाथरे, किरण पवार, सशांक पोईपकर, भूषण पाटकर, मधुकर ननावरे, केतन आंग्रे, उमेश भोईर, ओमकार चौधरी, संदीप नागे, योगेश राणे यांच्यासह नागरिक महिला मोठया प्रमाणात उपस्तित होते.

इतर वसाहतीप्रमाणे सिडकोने करंजाडे नोड हा विकसित केला असून सध्या या नोडमध्ये ५५० इमारती असून साधारणतः या नोडमध्ये एक लाखाच्या आसपास लोकसंख्या आहे. सिडकोने करंजाडे नोड विकसीत करीत असताना येथे राहाणा-या रहीवाश्यांना लागणा-या मुलभुत गरजा लक्षात घेतलेल्या आहेत. त्यामुळे या नोडमध्ये राहाणाऱ्या रहीवाश्याना मुलभूत सुविधा पाणी, वीज व रस्ते हया सुविधा देणे सिडकोचे कर्तव्य आहे. या मुलभूत सुविधापैकी पाणीपुरवठा करणे ही रहीवाश्यांची अत्यावश्यक गरज आहे. करंजाडे नोड विभागात पाताळगंगा नदीचे पाणी भोकरपाडा येथे शुध्दीकरण करून जलवाहीनीद्वारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सिडकोस पाणी दिले जाते व सिडकोद्वारे पाणी करंजाडे वसाहतीला पूरवित आहे. परंतु गेल्या ४ महीन्यापासून येथील रहीवाश्यांना पुरेसे पाणी सिडकोकडून पुरविले जात नाही. त्यामुळे गेल्या ४ महीन्यापासून करंजाडे नोडमधील रहीवाश्यांना पाणी टंचाईला समोर जावे लागले आहे. यापूर्वी सिडको कार्यालयावर जलआक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र सिडकोने नेहमीप्रमाणे कागदीघोडे रंगवित दिखाऊपणा केला. यावेळी पाणीपुरवठा सुरळीत करतो असे कार्यकारी अभियंता श्री.पी.मूळ  यांनी सांगितल्याने तसेच सिडको प्रशासन व पोलीस प्रशासनाने मोर्चा आंदोलन स्थगित करण्याची विनंती केल्याने मोर्चा स्थगित केले. परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाणीपुरवठा करण्याबाबतची हतबलता असल्याने व सिडकोकडून कोणतीही उपाययोजना होत नसल्याने सिडकोकडून करंजाडेवासीयांना पाणी न देण्याच्या सिडकोच्या अन्यायकारक भुमिकेच्या निषेधार्थ मंगळवार दिनांक २९/०८/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता सिडको भवनावर जलआकोश मोर्चा आंदालनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी दिली.

जलआक्रोश मोर्चाचा मार्ग असा असेल..

सदरचा मोर्चा कॉलेज फाटा, करंजाडे येथून निघून दुचाकी, चारचाकी व रीक्षाने चिंचपाडा विमानतळ मार्ग – विमानतळ उलवा गेट- बेलापूर किल्ला कंपाउंड सर्कल- सेक्टर १५, बेलापूर येथे जावून तेथून पायी सिडको भवन येथे धडक मोर्चाचे स्वरूपात जाईल.

"कार्यकारी अभियंता बोलतात एक आणि करतात एक"..

गेल्या चार महिन्यापासून करंजाडे वसाहतीला पाणी टंचाई आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून आंदोलनात सहभागी झालो आहोत. सिडको अधिकारी महामंडळाचे अधिकारी आहेत. गेंड्याच्या कातडी सारखे असवेंदनशील अधिकारी आहेत. पाणी विभागाचे पी. मूळ यांच्याशी बैठक होती. तेव्हा म्हणाले पाण्याबाबत काही विषय असेल तर केव्हाही फोन करा.. मात्र फोन लावल्यास उचलत नाही किंवा कोणताच प्रतिसाद देत नाही. असे बेजवाबदार अधिकारी सिडकोचे आहेत.

- सी. टी. पाटील - रहिवाशी, माजी पोलीस अधिकारी

स्थानिक आमदारांनाही घेराव घालून जाब विचारणार - आक्रमक महिला 

करंजाडे वसाहतीतील रहिवाशी आहेत. त्यांच्या मूलभूत गरजा जे आहेत. ते सिडकोकडून देण्याबाबत लोकप्रतिनिधी व स्थानिक आमदार यांनी पुढाकार घेयाला हवा होता. आम्हीं मत दिलेत आणि ते निवडून आलेत. त्यांनी आम्हाला उत्तरे द्यावीत. याबाबत वेळ पडल्यास स्थानिक आमदारांनाही घेरावा घालू. आम्हांला गणपतीच्या आधी पाणी सुरळीत पाहिजे.

- अर्चना बनावली सेक्टर 6 - आक्रमक महिला 

सिडकोने महिलांची सहनशिलता पहिली.. आता "आक्रोश" पहायला तयार रहा..

करंजाडे वसाहतीला सिडकोच्या दुर्लक्षामुळे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सिडकोचे अधिकारी गेंड्याच्या कातडीसारखे आहेत. पाण्यावाचून कोणी मेले तरी त्यांना फरक पडत नाही. मात्र सिडको पाणी पुरवठा अधिकारी यांनी महिलांची सहनशिलता पहिली आहे, महिलांचा आक्रोश पहायला तयार रहा.

- हेमा गोटमारे - आक्रमक महिला
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image