युवासेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)सक्रिय कार्यकारणी सदस्य विक्रांत जाधव यांचा रायगड दौरा...
      विक्रांत जाधव यांचा रायगड दौरा...


पनवेल दि. १२ ( वार्ताहर ) : युवासेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) सक्रिय कार्यकारणी सदस्य विक्रांत जाधव यांनी विभागीय सचिव मंदार शिरसाठ, विस्तारक सुधीर ढाणे यांच्यासह उत्तर रायगड मध्ये पनवेल विधानसभा आणि कर्जत विधानसभा येथे पदाधिकारी व युवासैनिकांच्या कामाचा आढावा घेतला.तसेच पुढील वाटचालीसाठी पक्ष कार्यपद्धती व युवासेनेने करावयाच्या कामांबद्दल सर्वाना मार्गदर्शन केले.
      यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्यासह जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे, उपजिल्हाधिकारी निखिल पाटील, उपजिल्हाधिकारी अवचित राऊत, जिल्हा चिटणीस प्रशांत खांडेकर, शिवसेना महाराष्ट्र राज्य सोशल मिडिया समन्वयक व विधानसभा अधिकारी पराग मोहिते, तालुका अधिकारी केवल माळी, तालुका अधिकारी प्रथमेश मोरे, तालुका अधिकारी महेश पाटील, तालुका अधिकारी दिपक म्हात्रे, तालुका चिटणीस ॲड. संपत हडप यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी व युवासैनिक उपस्थित होते.
फोटो - युवासेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) सक्रिय कार्यकारणी सदस्य विक्रांत जाधव यांचा रायगड दौरा
Comments