पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे झाले सेवानिवृत्त...
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे झाले सेवानिवृत्त...

पनवेल दि.०१ (संजय कदम) : पनवेल शहर पोलीस ठाण्यात प्रशासकीय विभागात कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक दिलीप महादेव शिंदे हे सेवा निवृत्त झाले आहेत. या निमित्ताने नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी त्यांचा सहपत्नीक विशेष सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन पनवेल शहर पोलीस ठाण्यात वपोनि नितीन ठाकरे यांच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी वपोनि विजय कादबाने, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, प्रमोद पवार यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.             
सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांचा पोलीस सेवेतील कार्यकाळ खडतर असा होता. कोकणसुपुत्र असलेले दिलीप शिंदे हे २० ऑगस्ट १९८३ रोजी पोलीस खात्यात पोलीस शिपाई म्हणून भरती झाले. त्यानंतर अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत त्यांनी पोलीस खात्यात कार्यरत असताना इतर पोलीस परीक्षा देत त्यांना पदोन्नती मिळाली. मुंबई येथे कार्यरत असताना ते प्रामख्याने तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांचे खाजगी सुरक्षारक्षक म्हणून अनके वर्षे कामकाज पहिले. त्यांनतर मुंबई भोईवाडा येथील गुन्हे शाखेत कार्यरत होते. यावेळी त्यांनी अत्यंत किचकट व गंभीर गुन्हयांची उकल केली. त्यांनतर पनवेल शहर पोलीस ठाण्यात प्रशाकीय विभागात त्यांची नेमणूक झाली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी किचकट अश्या शिवकर येथील तरुण मुलाच्या खुनाची उकल त्याचप्रमाणे फेसबुकच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या गुन्ह्याची उकल हि त्यांची प्रमुख कामगिरी ठरली. आतापर्यंत त्यांनी पोलीस खात्यात एकूण सेवा ३९ वर्षे ११ महिने ११ दिवस एवढी ठरली आहे. ३१ जुलै सेवानिवृत्तीच्या दिवशी देखील त्यांनी आपले कार्यालयीन कामकाज सुरु ठेवून जनतेच्या समस्या सोडवल्या. पोलीस खात्यात काम करत असताना त्यांनी वकिलीची सनद मिळवण्यासाठी आपली धडपड सुरु ठेवली. त्यांना निरोप देताना पनवेल शहर पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. यावेळी दिलीप शिंदे यांना मराठी फेटा घालून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वतीने निरोप देण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी स्वतः वाहन चालवून दिलीप शिंदे यांना सन्मानपूर्वक त्यांच्या घरापर्यंत सोडले.




फोटो : पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांचा निरोप समारंभ
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image