तळोजा फेज १ व २ या विभागाला सद्गुरू वामनबाबा महाराज नगर नाव देण्याची शिवसेनेची(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सिडकोकडे मागणी....
शिवसेनेची(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सिडकोकडे मागणी....


पनवेल वैभव / दि. २० ( संजय कदम  ) : पनवेल तालुक्यातील तळोजा फेज १ व तळोजा फेज २ या विभागाला सद्गुरू वामनबाबा महाराज नगर असे नाव देण्याची शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाने सिडको कडे मागणी केली आहे . 
                     शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिडकोने नव्याने वसविलेल्या तळोजा विभागास तळोजा फेज १ व फेज २ असे संबोधिले जाते. या विभागामध्ये नव्हे तर रायगड व ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांनी वारकरी संप्रदाय रुजविला, जोपासला व वारकरी संप्रदाय वाढविला असे प्रसिद्ध सद्गुरू वामनबाबा महाराज तळोजा विभागात होऊन गेले , त्यांची  विचारधारा जतन करण्यासाठी त्यांचे नाव देणे आवश्यक आहे. यापूर्वी या भागातील वारकरी व ग्रामस्थांनी तळोजा  व पेंधर  मेट्रो स्टेशनला महाराजांचे नाव देण्याची मागणी सिडकोकडे केली होती, मात्र सिडकोने अगोदरच नाव दिल्याने महाराजांचे नाव देता आले नाही तरी वारकरी संप्रदाय व नागरिकांच्या मागणी नुसार या तळोजा विभागाला सद्गुरू वामनबाबा महाराजांचे नाव देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे . 




फोटो - बबन पाटील
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image