पनवेलमध्ये थोरल्या पवारांना 'मोठा' पाठिंबा ; प्रतिज्ञापत्र भरून अनेकांनी दाखवली निष्ठा...
विविध सेलचे पदाधिकारी शरद पवारांबरोबर....

डॅमेज कंट्रोल बैठकीला पदाधिकारी कार्यकर्त्यांचा उस्फुर्त प्रतिसाद
पनवेल/ प्रतिनिधी:- पनवेल शहर व ग्रामीण भागातून थोरल्या पवारांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा वाढत आहे. विशेष म्हणजे युवक, महिला, युवती आणि विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी खारघर येथे पार पडलेल्या डॅमेज कंट्रोल बैठकीत उस्फूर्तपणे सहभाग नोंदवण्यात आला. उपस्थितांनी प्रतिज्ञापत्र भरून देऊन अडचणीच्या काळामध्ये 83 वर्षांच्या योद्धा शी असणारी आपली निष्ठा दाखवून दिली.

अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडले आहे. त्यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेऊन बंडखोरी केली आहे. दरम्यान पक्षांमध्ये दोन गट पडले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राष्ट्रवादी व घड्याळ चिन्हावर दावा सांगितला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. आपण जनतेत जाऊन दाद मागू आणि पुन्हा पक्ष उभा करू अशा प्रकारची घोषणा शरद पवार यांनी केली आहे. त्यानुसार त्यांनी छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात सभा घेऊन दंड थोपटले आहेत. लवकरच ते महाराष्ट्राचा दौरा करून जनतेकडे दाद मागणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात शरद पवारांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला आहे. पनवेल शहर व ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत थोरल्या पवारांबरोबर राहण्याचा निर्णय अनेक पदाधिकाऱ्यांनी घेतला. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर, प्रभारी जिल्हाध्यक्ष प्रमोद बागल यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी राजकारणात सुरू असलेल्या चालू घडामोडी बाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आले. शरद पवार हेच आपले अध्यक्ष आणि नेते असून त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याची एक प्रकारे प्रतिज्ञा उपस्थित घेतली. अजित पवार आणि इतर सहकाऱ्यांनी केलेला बंडा मुळे जनतेच्या मनामध्ये प्रचंड चीड निर्माण झाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या या कूट नितीला आगामी निवडणुकीमध्ये मतदार जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची भावना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. पनवेल शहर आणि ग्रामीण भागात पक्ष संघटना वाढीच्या दृष्टिकोनातून सर्वांनीच पुढे येऊन प्रयत्न करण्यात चा निर्णयही घेण्यात आला.
 
यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव सूरदास गोवारी, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष फारूक भाई पटेल,जेष्ठ नेते महादेव पाटील,उत्तमराव गायकवाड,युवक प्रदेश सचिव नारायण खरजे, महिला जिल्हाध्यक्षा राजश्री  कदम,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष राजू मुलाणी, माजी ओबीसी जिल्हाध्यक्ष विजय मयेकर,सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष किशोर देवधेकर,व्हीजेएनटी सेल जिल्हाध्यक्ष आनंद भंडारी,लीगल सेल जिल्हाध्यक्ष पवनकुमार गायकवाड,पदवीधर सेल जिल्हाध्यक्ष स्वप्नील काटकर,कामोठे शहराध्यक्ष चंद्रकांत नवले,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश  रांजवण, जिल्हा सचिव ज्ञानेश्वर शिंदे,जिल्हा सरचिटणीस नागेश पवार,जिल्हा सरचिटणीस रामदास नारकर,जिल्हा सरचिटणीस कृष्णा मर्ढेकर, खारघर शहर युवक अध्यक्ष संतोष आसबे, उपाध्यक्ष मनीष कुळे, खारघर महिला शहराध्यक्ष रेणुका पगारे,रोजगार स्वयंरोजगार सेल जिल्हाध्यक्ष संतोष शेट्टी, पनवेल ग्रामीण चे नामदेव पाटील,ग्रामीण तालुका सरचिटणीस जब्बार शेख,चिंद्रन चे उपसरपंच सुजित पाटील,रुपेश मुंबईकर,माजी तालुकाध्यक्ष विनोद जाईलकर,ओबीसी खारघर शहराध्यक्ष नरेश पाटील,उपाध्यक्ष तुकाराम भगत, युवक जिल्हा उपाध्यक्ष राजू नलवडे,जिल्हा सरचिटणीस हुसेन पटेल,जिल्हा सरचिटणीस प्रशांत देशमुखे,जिल्हा सचिव चांद शेख,जिल्हा सहसचिव हर्षद बडे, संकेत बडे, तुषार सावंत,राहुल यमगर्णी ,शैलेश लोंढे,खारघर युवक कार्याध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने युवक,महिला,जेष्ठ आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते बैठक पार पाडण्यासाठी युवक कार्यध्यक्ष शहबाज पटेल व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र राज्य महामंडळातील संचित तोटा संदर्भात चौकशी करणेबाबत महामाहीम राष्ट्रपतींना निवेदन..
Image
'कमवा आणि शिका' उद्दिष्टाने कमवले “बार काउन्सिल ऑफ़ इंडिया” चे सदस्यत्व आणि 'मास्टर ऑफ लॉ' पदवी ; लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले अभिनंदन व कौतुक
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या देवद शाखेतर्फे आषाढी एकादशी निमित्त भाविकांना तुळशी रोपांचे वाटप...
Image
शिवबंधन बांधून शेकडो महिलांनी केला शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश...
Image