शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी इर्शाळगड दरडग्रस्त जखमींची केली चौकशी...
इर्शाळगड दरडग्रस्त जखमींची केली चौकशी...

पनवेल वैभव / दि.२० (संजय कदम) : अतिवृष्टीमुळे खालापूर येथील इर्शाळगड पायथ्याशी मोठी दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. इर्शाळवाडीवर मोठी दरड कोसळून अनेकजण मृत्यूमुखी पडले आहे. या दुर्घटनेत काही नागरिक सुखरूप वाचले असून काही अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. यावेळी जखमींना तात्काळ उपचार मिळण्यासाठी एमजीएम रुग्णालयात कामोठे येथे दाखल करण्यात आले आहे. या प्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी जखमींची रूग्णालयात भेट घेतली तसेच डॉक्टरांशी चर्चा केली. यावेळी त्यांचे नातेवाईक तिथे उपस्थित होते त्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.
           सोबत उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, उपमहानगर संघटक सूनित पाटील, शहर प्रमुख यतीन देशमुख, प्रवीण जाधव, सूर्यकांत म्हसकर, शहर संघटक संतोष गोळे, राकेश टेमघरे उपशहर प्रमुख दिपक पाटील, विभाग प्रमुख बबन गोगावले, ॲड. अमर पटवर्धन, महिला आघाडी विधानसभा संघटीका सौ. रेवती सकपाळ, उपमहानगर संघटीका सौ. संचित राणे, शहर संघटीका सौ. संगीता राऊत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.




फोटो : जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी घेतली रुग्णांची भेट
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image