वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी केली डुंगी व इतर विमानतळालगत गावांची पाहणी...
डुंगी व इतर विमानतळालगत गावांची पाहणी... 
पनवेल दि.०८ (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील डुंगी गावात दरवर्षी मुसळधार पावसामुळे पाणी शिरून ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात पुराच्या पाण्याची समस्या जाणून घेण्यासाठी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी डुंगी व विमानतळ लगत गावांना भेट देऊन पाहणी केली.
  डुंगी गावात दरवर्षी मुसळधार पावसामुळे पाणी शिरून ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात पुराच्या पाण्याची समस्या जाणून घेण्यासाठी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वपोनि नितीन ठाकरे यांनी ग्रामस्थांसोबत चर्चा करून पुराच्या पाण्याची समस्या व विमानतळ लगत गावच्या समस्या याबाबत पोलिसांकडून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी डुंगी व विमानतळ लगत गावांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी सिडकोतर्फे पाणी निचरा होण्यासाठी लावण्यात आलेल्या सक्शन पम्प तसेच कामाची पाहणी केली. त्याचप्रमाणे नवी मुंबई विमानतळ परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी मुसळधार पावसात पाण्याचा साठा होऊ नये म्हणून घेण्याच्या काळजी व सूचना दिल्या. यावेळी पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, गोपनीय विभागाचे अधिकारी संजय धारेराव, किरण सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 
फोटो : पाहणी करताना वपोनि नितीन ठाकरे व इतर अधिकारी
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image