घरफोडीत ३ लाख रुपयाचा मुद्देमाल लंपास...
घरफोडीत ३ लाख रुपयाचा मुद्देमाल लंपास... 

पनवेल दि.०८ (संजय कदम) : गावी गेलेल्या 

कुटुंबातील घरी कोणी नसल्याचे पाहून घरातील कडी-कोयंडा तोडून घरातील कपाटात असलेले रोख रक्कम व दागिने असा एकूण ३ लाख रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना तळोजा वसाहतीत घडली आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.   
तळोजे फेज १ येथील ऑरेंज आर्केड इमारतीत राहणारे रश्मीन शराफत अली सुर्वे हे कुटुंबासह मुळ गावी गेले होते. यादरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांचे घराचा कडी कोयंडा तोडुन घरात प्रवेश करुन ३० हजार रुपये रोख रक्कम, ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे ब्रेस्लेट,६० हजार रुपये किमतीचे सोन्याची चैन, ८० हजार रुपये किंमतीचे अंदाजे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील ०७ एअर रिंग व झुमके, १ लाख रुपये किंमतीचे ५ अंगठया असा एकुण ३ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिरसाठ करीत आहेत.
Comments
Popular posts
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image
स्वीकृत नगरसेवक पदी प्रथमेश सोमण यांच्या नावावर शिक्कामोर्तब...
Image