वडगांव येथे एचपीसीएल कंपनीच्या माध्यमातून स्वच्छता पंधरवडा अंतर्गत साहित्याचे वाटप....
स्वच्छता पंधरवडा अंतर्गत साहित्याचे वाटप....
पनवेल दि.१३ (संजय कदम) : खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वडगांव येथे मे. एच.पी.सी.एल लि या कंपनीच्या माध्यमातून स्वच्छता पखवाडा (स्वच्छता पंधरवडा) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमांतर्गत मे. एच.पी.सी.एल लि या कंपनीने ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट, गमबुट, हॅन्ड ग्लोव्हज् नोज मास्क इत्यादी साहित्य वाटप करणेत आले. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीस २ मोठया डस्टबिनचे वाटप करण्यात आले. 
              
सदर स्वच्छता पखवाडा कार्यक्रमाप्रसंगी कंपनीचे मॅनेजर श्री रोहित, हेमंत कुमार, प्रशांत सावंत, प्रविण लबडे तसेच ग्रामपंचायत सरपंच सौ. गौरी गडगे, ग्रामविकास अधिकारी रश्मी शिंदे, ग्रा.पं. सदस्य महादेव गडगे, राजेश पाटील, ग्रा.पं. इंजिनियर विजय चौधरी, आरोग्य कर्मचारी महेश तांबडे, गजानन बडदाडे, तसेच सामाजिक कार्यकर्ते दशरथ पाटील, संदीप शिंदे ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी एचपीसीएल हेमंत कुमार यांनी ग्रुप ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना स्वच्छता विषयी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच गौरी गडगे यांनी मे. एच.पी.सी.एल या कंपनीचे व कंपनी व्यवस्थापनाचे ग्रामपंचायतीच्या वतीने आभार मानले.फोटो : एचपीसीएल कंपनीच्या वतीने वडगांव येथे साहित्य वाटप
Comments