पनवेल शहर पोलीस ठाणे येथे महिला दक्षता समितीची बैठक संपन्न....
पनवेल शहर पोलीस ठाणे येथे महिला दक्षता समितीची बैठक संपन्न....
पनवेल / दि.०४ (संजय कदम) : महिलांच्या अडचणी समजून घेण्यासाठी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महिला दक्षता समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी वपोनि नितीन ठाकरे यांनी महिलांच्या अडचणी समजून घेत सायबर गुन्हे व महिला विषयी सोशल मीडियाच्या जनजागृतीबाबत मार्गदर्शन केले. 
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे येथे महिला दक्षता समितीच्या सदस्यांची बैठक बोलावली होती. महिलांच्या अडचणी समजून घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वपोनि नितीन ठाकरे यांनी महिलांच्या अडचणी समजून घेऊन संबंधितांना कार्यवाही करण्याबाबत सूचना केल्या. तसेच उपस्थित महिलांना सायबर गुन्हे व महिला विषयी सोशल मीडिया बाबत जागृती कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस निरीक्षक अजीज बागवान, गोपनीय विभागाचे अधिकारी संजय धारेराव यांच्यासह महिला दक्षता कमिटीचे सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते. दरम्यान यावेळी महिला दक्षता कमिटीच्या वतीने नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे व पोलीस निरीक्षक अजीज बागवान यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
फोटो : महिला दक्षता समितीची बैठक
Comments