नील हॉस्पिटल आयोजित डिवाईन गर्भसंस्कार व होलिस्टिक IVF प्रोजेक्ट कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद...
 कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद...
पनवेल / प्रतिनिधी : - 
नील हॉस्पिटल येथे आयोजित केलेल्या डिवाईन गर्भसंस्कार आणि होलिस्टिक IVF प्रोजेक्ट च्या एक दिवसीय अनुभवात्मक कार्यशाळेला पूर्ण सभागृहाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

गर्भवती माता खुश आणि स्वस्थ राहिल्या तर येणारे बाळ खुश व स्वस्थ होईल.गर्भसंस्कारामुळे बाळ सुसंस्कारी, ज्ञानवान, सर्व गुणांनी संपन्न, शक्तीशाली, चरित्रवान, बुद्धिवान होण्यास मदत होते. दिव्य गर्भसंस्कारातून दिव्य भारत निर्माण करणे हे ह्या कार्यशाळेचे उद्देश आहे. या कार्यशाळेत गर्भवती महिलांना प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ शुभदा नील, बीके वैष्णवी, बीके आरती यांच्या द्वारे गर्भवती महिलांनाचा आहार, व्यायाम, मेडिटेशन, नॉर्मल डिलिव्हरी व इतर विषयांवर मोफत मार्गदर्शन करण्यात आले. 
गर्भवती महिलांची हिमोग्लोबिन व डायबेटिस साठी मोफत रक्त तपासणी करण्यात आली.
दर महिन्याला डिवाईन गर्भसंस्कार आणि होलिस्टिक IVF प्रोजेक्ट साठी अशी एक दिवसीय मोफत अनुभवात्मक कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे, जास्तीत जास्ती गर्भवती महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ शुभदा नील यांनी केले.

डॉ कविता चोतमोल माजी महापौर पनवेल महानगरपालिका यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. डॉ शुभदा नील यांचे या कार्यासाठी त्यांनी कौतुक व अभिनंदन केले. या वेळी डॉ कविता चोतमोल यांचा ब्रह्मा कुमारीज तर्फे डॉ शुभदा नील यांच्या हस्ते शिव परमात्म्याचे स्मरण चित्र देऊन सत्कर करण्यात आला.
Comments