ओडिसा रेल्वे अपघातातील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याची अभिजीत पाटील यांनी केली मागणी....
 अभिजीत पाटील यांनी केली मागणी....


पनवेल दि.०५ (वार्ताहर) : ओडिसा येथे घडलेला रेल्वे अपघात हा सर्वात भीषण रेल्वे अपघात आहे. ही घटना मन हेलावणारी आहे. या अपघाताच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या प्रवासी वर्गावर हा मोठा आघात आहे. त्यामुळे रेल्वे अपघातातील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना २५ लाख रुपये व जखमींना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत सरकारने द्यावी, अशी मागणी मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य अभिजीत पाटील यांनी केली आहे.
            ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास मोठा रेल्वे अपघात झाला. कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी या दोन्ही गाड्या एकाच वेळी एकाच रूळावर आल्याने हा भीषण अपघात झाला. अपघातात जवळपास ३०० प्रवाशांचा मृत्यू व ९०० पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. तर मृत्यूचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अभिजीत पाटील पुढे म्हणाले रेल्वेचा प्रवास हा अत्यंत सुरक्षित समजला जातो. ओडिशा येथील ही घटना अत्यंत मन हेलावणारी असून केंद्र सरकारने बसवलेली 'कवच' यंत्रणा त्याठिकाणी सपशेल कुचकामी ठरल्याचे दिसून येते. या घटनेची सखोल चौकशी करून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अभिजीत पाटील यांनी केली.  
फोटो : अभिजित पाटील
Comments
Popular posts
'शौर्यम दिवस' के मौके पर 'शौर्यम ट्रिब्यूट बाइक राइड' का आयोजन...
Image
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
हृदयाच्या आरोग्यासाठी खारघरमध्ये 'वॉकेथॉन' ; जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा उपक्रम...
Image
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखेंची पेणमध्ये सदिच्छा भेट ; बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाला उपस्थिती
Image
उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत क्रीडांगण उभारण्याची मागणी ; नगरसेवक ऍड.मनोज भुजबळ यांचे महापौरांना निवेदन
Image