पनवेल येथे आयोजित काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानाला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल वैभव / दि.०२ (वार्ताहर) : पनवेल शहरातील तथास्तु सभागृह येथे काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी संघटन सृजन अभियान आयोजित करण्यात आले आहे. या बैठकीत राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. रागिणी नायक यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. प्रतिकूल परिस्थितीत काँग्रेस पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी नेहरू-गांधी यांच्या विचारांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. रागिणी नायक, प्रदेश निरीक्षक ऍड तौफिक मुलाणी, प्रदेश निरीक्षक श्रीरंग बरगे, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी बोलताना राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. रागिणी नायक यांनी सांगितले कि, राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मार्गदर्शनानुसार गावा-गावात जाऊन आम्ही विविध समाजातील लोकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. समाजातील शेवटच्या व्यक्तीला न्याय देण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे पक्षांतर्गत मोठ्या प्रमाणात बदल घडणार असून कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेत आहोत. त्याप्रमाणे नवीन कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुद्धा हल्ला करत ते देशाचे नुकसान करत असल्याचे सांगितले.
यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी महिला आघाडी प्रभारी चंद्रकला नायडू, नगरसेवक हरेश केणी, लतीफ शेख,लीला कातकरी,जनार्दन पाटील, कामगार नेते वैभव पाटील, ऍड श्रुती म्हात्रे प्रदेश सचिव,हेमराज म्हात्रे,निर्मला म्हात्रे, शशिकांत बांदोडकर, शैलेश पाटणे, डॉ अमित दवे,प्रितेश साहू,चेतन म्हात्रे, सुरेश पाटील, के. एस. पाटील, अरुण कुंभार, अमित लोखंडे, सुधीर मोरे, राकेश जाधव आदी उपस्थित होते.
फोटो : काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानाला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद