१ कोटी ५७ लाख ६४ हजार ५७० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी फिर्यादींना केला सुपूर्द...
१ कोटी ५७ लाख ६४ हजार ५७० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी फिर्यादींना केला सुपूर्द 

पनवेल वैभव / दि ३ (संजय कदम) : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या पनवेल विभागांतर्गत येणाऱ्या पनवेल शहर, पनवेल तालुका आणि खांदेश्वर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विविध गुन्ह्यांत जप्त केलेला एकूण १ कोटी ५७ लाख ६४ हजार ५७० रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत करण्यात आला. पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे आयोजित या कार्यक्रमामुळे आपली चोरीला गेलेली मालमत्ता पुन्हा मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. 
यामध्ये ८९ लाख रुपये किमतीची २३ चारचाकी वाहने, ७ लाख २५ हजार रुपये किमतीचे ४२ मोबाईल फोन, ५९ लाख ५५ हजार ५७० रुपये किमतीचे ५८० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १ लाख ८४ हजार २०० रुपये किमतीच्या ८ दुचाकी वाहनांचा समावेश आहे. आपली हक्काची मालमत्ता परत मिळाल्याबद्दल नागरिकांनी पोलिसांच्या कार्यतत्परतेचे कौतुक करत त्यांचे आभार मानले. ही यशस्वी कामगिरी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, परिमंडळ ३ चे पोलीस उप आयुक्त प्रशांत मोहिते आणि पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. 
या मोहिमेत पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे आणि खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी आपल्या पथकासह महत्त्वाची भूमिका बजावली.



फोटो : मुद्देमाल सुपूर्द
Comments