मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये कॉक्लियर इम्प्लांट क्लिनिकचा शुभारंभ....
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये कॉक्लियर इम्प्लांट क्लिनिकचा शुभारंभ....

कॉक्लियर इम्प्लांटद्वारे रुग्णांना श्रवणक्षमता परत मिळवण्याची संधी...


नवी मुंबई / पनवेल वैभव  - : श्रवणदोषाचे वेळीच निदान आणि प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी *मेडिकव्हर हॉस्पिटलने विशेष कॉक्लियर इम्प्लांट क्लिनिक सुरू केले आहे. हा उपक्रम जन्मजात दोषामुळे बोलू न शकणाऱ्या मुलांसाठी, तसेच ज्या प्रौढांना श्रवणयंत्रांचाही फायदा होत नाही त्यांच्यासाठी प्रभावी उपचार प्रदान करणार आहे,* ज्यामुळे त्यांना त्यांची श्रवणक्षमता आणि संवाद कौशल्ये सुधारण्यास नक्कीच मदत होईल. प्रगत निदान तंत्रज्ञान , शस्त्रक्रियेतील कौशल्य आणि शस्त्रक्रियेनंतरचे रुग्णास लागणारी मदत, ही मुलांमध्ये वेळीच उपचार आणि उत्तम परिणाम सुनिश्चित करणे हे या क्लिनिकचे मुख्य उद्दिष्ट आहे.

 *नवी मुंबईतील ४ वर्षांच्या रोहित खन्नाला (नाव बदलले आहे) त्याचे पालक मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी घेऊन आले होते.* त्याला ऐकू येत नसल्याची आणि त्याच्या वयाच्या इतर मुलांप्रमाणे तो बोलू शकत नसल्याची चिंता त्याच्या पालकांना सतावत होती. BERA सह एक सखोल तपासणी करण्यात आले, ज्यातून दोन्ही कानांमध्ये तीव्र श्रवणदोष असल्याचे निदान झाले. याचा अर्थ, ते मूल बोलण्याच्या विकासासाठी आवश्यक असलेले आवाजच ऐकू शकत नव्हते. दोन वर्षांपूर्वी म्हणजेच वयाच्या दुसऱ्या वर्षी, त्या मुलाला पहिल्यांदा दोन्ही कानांमध्ये तीव्र श्रवणदोष असल्याचे निदान झाले होते. रुग्णाच्या कुटुंबाला उपचारांच्या पर्यायांविषयी समुपदेशन करण्यात आले. कुटुंबासाठी, हे निदान भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत त्रासदायक होते. कॉक्लियर इम्प्लांटेशन, तीव्र श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी सर्वात प्रभावी उपचार, ही एक खर्चिक प्रक्रिया आहे ज्यासाठी त्याच्या पालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. हॉस्पिटल टीमच्या पाठिंब्याने आणि मार्गदर्शनाने, 'द हान्स फाउंडेशन'च्या मदतीने ते कुटुंब या साऱ्या आव्हानांवर मात करू शकले, ज्यामुळे या चिमुकल्याचा नव्या आयुष्याचा प्रवास सुरु झाला. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये या बालरुग्णावर उजव्या बाजूच्या कॉक्लियर इम्प्लांटची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली, ज्यामुळे मुलाला श्रवण  क्षमता परत मिळाली. येत्या काही महिन्यांत या रुग्णाला नियमित श्रवण प्रशिक्षण आणि स्पीच थेरपीची दिसी जाईल. आता त्या बालरुग्णाला पहिल्यांदाच ऐकण्याची, बोलण्याची, भाषा शिकण्याची आणि विविध आवाजांचा अनुभव घेण्याची संधी मिळाली आहे, ज्यामुळे संवाद, शिक्षण आणि उज्ज्वल भविष्याचे मार्ग खुले झाले आहेत. नव्याने सुरू झालेल्या या क्लिनिकचा उद्देश हा आहे की, अशा अधिकाधिक मुलांना वेळीच निदान, योग्य उपचार आणि उत्तम जीवनमान जगण्याची संधी मिळावी.

क्लिनिकमध्ये विविध सेवा दिल्या जातात, ज्यात OAE, BERA, आणि ASSR सारख्या सखोल श्रवण तपासण्या, तसेच श्रवणयंत्राच्या चाचण्या आणि रुग्ण इंम्प्लांटकरिता पात्र आहे की नाही हे ठरविण्यासाठी पात्रतेचे मूल्यांकन करण्यात आले. रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना योग्य उपचार पर्याय निवडण्यास मदत करण्यासाठी याठिकाणी तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शनही केले जाते. पात्र रुग्णांसाठी, प्रगत कॉक्लियर इम्प्लांट प्रक्रियेपूर्वी सीटी (CT) आणि एमआरआय (MRI) तपासणी केली जाते. रुग्णांना इम्प्लांटशी जुळवून घेण्यास आणि श्रवण व संवाद कौशल्य सुधारण्यास मदत करण्यासाठी, क्लिनिक शस्त्रक्रियेनंतरच्या प्रोग्रामिंग (मॅपिंग) आणि बोलणे व ऐकणे यावसारख्या क्रियांवर विशेष लक्ष केंद्रित करते. जन्मजात किंवा लहान वयात श्रवणदोष असलेल्या मुलांमध्ये वेळीच निदान आणि उपचार करणे खुप  गरजेचे आहे.

*डॉ. राजेंद्र वाघेला(ईएनटी आणि एंडोस्कोपिक सर्जन - मेडिकव्हर हॉस्पिटल), म्हणाले,* किशोरवयीन आणि जन्मजात मुलांमध्ये श्रवणदोषासारख्या अनुवांशिक स्थितीमुळे,गर्भधारणेदरम्यानच्या संसर्गामुळे (जसे की रुबेला किंवा सीएमव्ही), किंवा जन्मावेळीच्या गुंतागुंतीमुळे, जसे की ऑक्सिजन पातळी कमी होणे किंवा मुदतपूर्व प्रसूती होऊ शकते. लहानपणी कानाच्या संसर्गामुळे किंवा काही विशिष्ट औषधांमुळेही हे होऊ शकते. श्रवणदोषाचा परिणाम संवाद, शिक्षण आणि जीवनाच्या एकूण गुणवत्तेवर होऊ शकतो. ज्या व्यक्तींना श्रवणयंत्रांचा (हियरिंग एड्स) फायदा होत नाही, अशा तीव्र श्रवणदोष असलेल्या व्यक्तींसाठी कॉक्लियर इम्प्लांट हा एक जीवन बदलणारा उपाय आहे. यासाठी पात्र रुग्ण जाणून घेण्यासाठी संपूर्ण तपासणी केली जाते आणि या प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर  रुग्णाच्या कुटुंबियांना मार्गदर्शन करतो. वेळीच उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण वेळीच उपचार केल्यास बोलणे आणि भाषा अवगत करण्याच्या कौशल्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा होऊ शकते आणि त्यानंतर अशा व्यक्तींना कोणावर अवलंबून न राहता स्वतंत्रपणे जगण्याची संधी आणि  आत्मविश्वास मिळतो.

 *डॉ. राजेंद्र वाघेला पुढे सांगतात,* कॉक्लियर इम्प्लांट ही केवळ एक शस्त्रक्रिया नाही; त्यासाठी शस्त्रक्रियेनंतरचे मॅपिंग आणि पुनर्वसनाद्वारे सतत मदतीची आवश्यकता असते. रुग्णांना सर्वोत्तम उपचार मिळावेत यासाठी आमचे हे क्लिनिक एकाच छताखाली समुपदेशन, थेरपी आणि नियमित फॉलो-अपची सुविधा उपलब्ध करुन देते. गरजू कुटुंबांना आर्थिक मदतीच्या पर्यायांविषयी माहिती देणे, त्यांना आर्थिक बाबतीत पाठबळ दिले जातात ज्यामुळे प्रगत श्रवण उपचार अधिक सुलभ आणि सोपे होतात.

एकाच छताखाली संपूर्ण श्रवण उपचार उपलब्ध करुन देत रुग्णांना अधिक चांगली श्रवण क्षमता मिळवून देणे आणि त्यांना प्रभावीपणे संवाद साधण्यास मदत करणे हे आमचे ध्येय आहे *असे *खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल्स केंद्र प्रमुख संदीप जोशी यांनी स्पष्ट केले.**
Comments