पनवेल महापालिकेच्या नव्या मुख्यालयाच्या इमारतीच्या आरेखनाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार...
 आरेखनाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार...

पनवेल,दि.११ ( वार्ताहर ): इंटरनॅशनल प्रापॅर्टी ॲण्ड ट्रॅव्हलच्यावतीने थायलंड येथे नुकतीच आंतरराष्ट्रीय स्तरावरील आरेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 'बेस्ट पब्लिक सर्व्हिसेस आर्किटेक्चर इंडिया' या गटामध्ये हितेन सेठी आर्किटेक्चरच्यावतीने सादर करण्यात आलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या नव्या मुख्यालयाच्या आरेखनाला पाच स्टार मानांकनांबरोबर एशिया पॅसिफिक प्रॉपर्टी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
                     इंटरनॅशनल प्रापॅर्टी ॲण्ड ट्रॅव्हलच्यावतीने दरवर्षी विविध देशामध्ये आशिया खंडातील विविध देशातील लोकपयोगी सेवा देणाऱ्या वेगवेगळ्या इमारतीच्या आरेखनांची स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षीची स्पर्धा थायलंड येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत आशिया खंडातील विविध देशातील वास्तू विशारदांनी सहभाग घेऊन आपली आरेखने सादर केली होती. या स्पर्धेमध्ये हितेन सेठी आर्किटेक्चरच्यावतीने पनवेल महानगरपालिकेच्या नव्या मुख्यालयाचे आरेखन सादर करण्यात आले होते. या आरेखनाला पाच स्टार मानांकनांबरोबर एशिया पॅसिफिक प्रॉपर्टी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याचबरोबर एशिया पॅसिफिक रिजन पुरस्कारासाठी देखील या आरेखनाला नामांकन प्राप्त झाले आहे. या पुरस्कारामुळे पनवेल महापालिकेच्या नव्या मुख्यालयाच्या इमारतीला एक महत्व प्राप्त झाले आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या दूरदर्शी विचारातून उभारण्यात येणारी पनवेल महानगरपालिकेची नवी इमारत असा पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील एकमेव महापालिकेची इमारत आहे.सहा मजली महापालिकेच्या या नव्या मुख्यालयामध्ये 224 आसन क्षमतेचे एक मुख्य सभागृह, 1 बहुद्देशिय हॉल, समिती सभागृह, टेरेसवरती आर्ट गॅलरी असणार आहे. ही इमारत जास्तीत जास्त टिकाऊ बनविण्यावरती हितेन सेठी आर्किटेक्चरच्यावतीने भर देण्यात आला आहे.या पुरस्काराबद्दल आयुक्त गणेश देशमुख यांनी मुख्यालयामध्ये हितेन सेठी यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी उपायुक्त सचिन पवार, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, एचएसए कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
महापालिकेच्या नुतन मुख्यालयाच्या तळमजल्याचे काम पुर्ण झाले असून येत्या काही दिवसांत इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब टाकण्यात येणार आहे. महापालिकेची नव्या इमारत प्रत्यक्षात आणण्यासाठी शहर अभियंता संजय जगताप,कार्यकारी अभियंता संजय कटेकर आणि संपुर्ण तांत्रिक टिम अथक परिश्रम घेत आहे.
फोटो - पनवेल महानगरपालिका
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image