विठ्ठल नामात दुमदुमली दुधे विटेवरी ....
      विठ्ठल नामात दुमदुमली दुधे विटेवरी ....

 
पनवेल / वर्ताहर  : -
दूधे विटेवरी कॉम्प्लेक्स कंरजाडे, पनवेल येथे "देवशयनी आषाढी एकादशी" निमित्त विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात पहाटे ६.०० वाजता विठ्ठल रुक्माई मूर्ती अभिषेक पासून सुरुवात झाली. अभिषेक व पूजा नंतर  ९.०० वाजता आरती  करण्यात आली. ११.०० वाजता ओंकारेश्वर महिला मंडळाने सूंदर भजन गायले . दुपारी २ वाजता श्री. एकनाथ ठाकूर संगीत विशारदक आणि उत्कृष्ट बासरी वादक यांनी भजन गायले. त्यानंतर ४ वाजता राधाकृष्ण भजनी मंडळ, कुंडे वहाळ यांनी भजन गायले. सांयकाळी ५ वाजता सीरवी समाजाच्या महिलांचे त्यांच्या भाषेत भजन झाले, सायंकाळी ६.०० वाजता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
सोसायटीच्या सर्व धर्मीय लहान मुलं आणि मुलींनी विठ्ठलाच्या वारीमध्ये  उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सर्व महिलांनी  फुगडी आणि रिंगण करुन ताळ वाजवून विठ्ठल नामाचा गजर केला. दिंडीसाठी पनवेल मार्केट यार्ड शाळेतल्या विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर छान साथ दिली.
संध्याकाळी ७.००  महाआरती झाली. रात्री ८. वाजता ह.भ.प सौ.वर्षा रानडे -सहस्रबुद्धे यांचे "जनाबाई" हे कीर्तन आयोजित केले होते.
संपूर्ण दिवस विठ्ठल नामात दुधे विटेवरी दुमदुमली, याप्रसंगी दुधे विटेवरी कॉम्प्लेक्स चे बिल्डर आणि सोसायटी कमिटी यांनी करंजाडे व पनवेल शहरातील सर्व भक्तांना निमंत्रण केले होते.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image