पोलीसकन्या श्रुती सुभाष कोकाटे हिचे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत सुयश..
पोलीसकन्या श्रुती सुभाष कोकाटे हिचे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत सुयश

पनवेल दि.२४ (संजय कदम) : खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दत्तात्रय कोकाटे यांची कन्या श्रुती सुभाष कोकाटे हिने अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत यश संपादन केले आहे. तिने संपूर्ण भारतातून ६०८ क्रमांक पटकावले आहे. याबद्दल नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारबे यांनी तिचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
                   केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा २०२२ चा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परकीय सेवा, भारतीय पोलिस सेवा, केंद्रीय सेवा गट अ, गट ब अशा पदांसाठी नागरी सेवा परीक्षा २०२२ घेण्यात आली होती. यूपीएससीने जाहीर केलेल्या निकालामध्ये नुकतेच खान्देश्वर पोलीस ठाण्यामधून खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदोन्नती झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांची कन्या श्रुती सुभाष कोकाटे हिने सुयश प्राप्त केले आहे. आपल्या वडिलांप्रमाणे देशासाठी सेवा करण्याची इच्छा बाळगणारी श्रुती हिने संपूर्ण भारतातून ६०८ वा क्रमांक प्राप्त केला आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण नवी मुंबई पोलीस दलात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. श्रुतीच्या या यशाबद्दल नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारबे यांनी तिचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





फोटो : पोलीसकन्या श्रुती सुभाष कोकाटे हिचे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत यश
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image