अज्ञात कारणावरून अज्ञात इसमाची हत्या; परिसरात खळबळ.....
अज्ञात कारणावरून अज्ञात इसमाची हत्या; परिसरात खळबळ.....


पनवेल दि.२४ (संजय कदम) : अज्ञात कारणावरून अज्ञात इसमाची कोणत्यातरी हत्याराने निघृण हत्याकरून सदर मृतदेह नाल्यात टाकून ते पसार झाल्याची घटना खान्देश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.     
नवीन पनवेल उड्डाणपुलाखालील रेल्वेपटरीजवळ असलेल्या वाहत्या नाल्यात अंबिकानगर सोसायटीजवळ एका इसमाचा मृतदेह तरंगत असल्याचे स्थानिकांना आढळून आहे. त्यांनी तात्काळ खान्देश्वर पोलिसांना याबाबत माहिती कळवली. खान्देश्वर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत सदर मृतदेह नाल्यातून बाहेर काढला असता त्याच्या कपाळावर डाव्या डोळ्याच्या डाव्या बाजूस उजव्या हाताच्या दंडावर व पार्श्वभागावर कोणत्यातरी धारदार शस्त्राने वार करून त्याला जीवे ठार मारले व त्याची ओळख पटू नये म्हणून त्याच्या अंगातील सर्व कपडे काढून त्याचा मृतदेह नवीन पनवेल उड्डाणपुलाखालील रेल्वेपटरीजवळ असलेल्या वाहत्या नाल्यात टाकून ते पसार झाले आहेत. सदर मयत इसमाचे अंदाजे वय ४५ ते ५० वर्षे असून तो रंगाने सावळा, अंगाने मजबूत, उंची १७४ सेमी आहे. तसेच पायात काळे सॉक्स घातलेले आहे. या इसमाबाबत किंवा घटनेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास खान्देश्वर पोलीस ठाणे दूरध्वनी क्र ०२२-२७४६५३३८ किंवा महिला पोलीस निरीक्षक गलांडे मॅडम यांच्याशी संपर्क साधावा. 

फोटो : नाला
Comments